Goa Fake Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

Goa Fake Police: गोव्यातील विविध भागांत पोलिसांच्या नावाखाली वृद्ध महिलांना लुटणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे.

Sameer Amunekar

Bicholim Fake Police Robbery Case : गोव्यातील विविध भागांत पोलिसांच्या नावाखाली वृद्ध महिलांना लुटणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी एका नाट्यमय पाठलागानंतर या तोतया पोलिसांना अटक करण्यात आली. हे संशयित गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांचे सोंग घेऊन सर्वसामान्यांना गंडा घालत होते, मात्र अखेर ते खाकी वर्दीच्या तावडीत सापडले आहेत.

अस्नोडा जंक्शनवर संशयास्पद हालचाली

मिळालेल्या माहितीनुसार, अस्नोडा जंक्शन परिसरात एक होंडा शाइन मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या ते फिरत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली होती. हे दोन्ही संशयित त्या परिसरात फिरून विशेषतः वृद्ध महिलांवर लक्ष ठेवून होते. पोलीस असल्याचे भासवून ते महिलांना बोलण्यात गुंतवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

पोलिसांचा थरारक पाठलाग आणि अटक

संशयितांच्या हालचालींवर पोलीस उपनिरीक्षक (PSI) एस. कामत आणि पोलीस कॉन्स्टेबल दयेश खांडेपारकर यांनी गुप्तपणे पाळत ठेवली. जेव्हा या अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर डिचोली पोलिसांच्या पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतरापर्यंत चाललेल्या या फिल्मी स्टाईल थरारानंतर पोलिसांनी या दोन्ही भामट्यांना घेराव घालून जेरबंद केले.

राज्यभरातील गुन्ह्यांशी संबंध

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, या टोळीचा गोव्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या घटनांशी जवळचा संबंध आहे. वृद्ध महिलांना सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने लुबाडणे, हा या तोतया पोलिसांचा मुख्य उद्देश असायचा. या अटकेमुळे अनेक चोरीच्या प्रकरणांचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्यांच्याकडून आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT