Minister Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Cancer News : फुफ्फुसाच्या कर्करोगाची गोमेकॉत साधनसुविधा

Cancer News : याशिवाय आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) शक्तीवर चालणारी फुफ्फुसाच्या कर्करोगाची साधने जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) उपलब्ध केली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Cancer News :

पणजी, राज्यात कर्करोगावर सर्व आवश्‍यक उपचारपद्धती उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी टाटा मेमोरिअलच्या सहकार्यानेही मल्टी सुपर स्पेशालिटीमध्ये कॅन्सर विभाग कार्यरत झाला आहे.

याशिवाय आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) शक्तीवर चालणारी फुफ्फुसाच्या कर्करोगाची साधने जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) उपलब्ध केली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

राणे म्हणाले की, त्वरित निदान, सुलभ आणि अत्याधुनिक उपचार पद्धतींचा वापर करून राज्यात कर्करोगग्रस्तांची काळजी घेण्यात राज्य आघाडीवर आहे.

शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रातही मोफत स्तन कर्करोग तपासणी होत असल्याने निश्‍चित त्याचा उपचारपद्धतीसाठी फायदा होत आहे.

गोमेकॉत स्तन कर्करोगाच्या रुग्णांसाठी ‘पेर्टुझुंब-ट्रस्टुझुंब’ या थेरपी मोफत पुरविण्यात येत आहेत. टाटा मेमोरिअलच्या सहकार्याने कर्करोगांवर उपचार सुविधा उपलब्ध करणे शक्य झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

- ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर

अत्याधुनिक यंत्रणेचा विचार केला तर गोमेकॉत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शक्तीवर चालणाऱ्या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. अशी साधने उपलब्ध केल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी जिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्रांमध्ये होईल आणि कर्करोगग्रस्तांवर उपचार करणे सोपे होईल, असेही राणे यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Board HSSC Result: 12 वीचा निकाल जाहीर! 92.96% विद्यार्थी उत्तीर्ण, यंदाही मुलींनीच मारली बाजी

Goa Accident: नाकेरी-बेतुल येथे भीषण अपघात; 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, भटक्या गुरांचा अडथळा ठरला जीवघेणा

KKR ला दुसरा 'मोठा' झटका! हर्षित राणानंतर आता 'हा' मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून बाहेर

Viral Video: 'डायपर'चा असाही वापर! कोल्ड-ड्रिंक थंड ठेवण्यासाठी तरुणाचा 'देसी जुगाड', पाहा कसं बनवलं घरगुती मिनी फ्रीज

पदार्पण असावं तर असं! 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणातच झळकावलं शतक, रचले दोन विश्वविक्रम Watch Video

SCROLL FOR NEXT