पणजी: गोव्यात अनेक ठिकाणी इंटरनेटसेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे डिजिटल जगात ऑनलाईन कामावर विसंबून असलेल्या अनेकांची गैरसोय झाली आहे. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी चुकीची केबल कापल्याने इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील दोन ते तीन लाख युझरची गैरसोय झाल्याची माहिती मिळतेय.
राज्यात वीज खांबांवर इंटरनेटच्या केबल्सचे जाळे निर्माण झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल गोवा वीज खात्याने घेतली असून, राजधानी पणजीसह विविध ठिकाणी कर्मचारी वीज खांबावरील इंटरनेटच्या केबळ हटविण्याचे काम करतायेत. दरम्यान, इंटरनेट सेवा पुरवठादाराची मुख्य लाईन कर्मचाऱ्यांनी कापल्याने राज्यातील अनेक ठिकाणची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यामुळे राज्यातील दोन ते तीन लाख युझर्सला फटका बसला आहे. राज्यात वीज खात्याने वीज खांबांवर लावण्यात आलेल्या इंटरनेट केबल्स विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राजधानी पणजीतून केबल हटविण्याचे काम कर्मचारी करतायेत. दरम्यान, इंटरनेट सुविधा पुरवठादाराची मुख्य केबल कापल्याने राज्यातील काही ठिकाणी इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे.
"राजधानी पणजीत वीज खांबांवरील इंटरनेट केबल हटविण्याचे मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोणीही दंडाची रक्कम भरली नसल्याने खांबांवर निर्माण झालेले केबल्सचे जाळे हटविण्याचे काम सुरुये. केबल हटविण्याची मोहीम सुरुच राहणार असून, बंद होणार नाही. पणजीतून याची सुरुवात करण्यात आली असून, ती पुढे मडगाव आणि वास्कोसह इतर ठिकाणी देखील सुरु केली जाईल", अशी माहिती कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.