Goa Hill Cutting|Goa Land Conversions Dainik Gomantak
गोवा

Arambol: सरकारने जनभावना ओळखून निर्णय घ्यावा अन्यथा..! जमिनी रुपांतरण नोटीशींवरुन स्थानिक संतप्त

Land Conversions In Goa: गोव्यात जमिनी रुपांतरण प्रश्‍न गाजत असून सपाट जमिनीबरोबरच प्रत्येक गावातील डोंगर,नदी, नाले तसेच ‘ना विकसित क्षेत्र’मध्ये जमिनीचे घाऊक पद्धतीने रुपांतरण चालूच आहे. याबाबत स्थानिकांमध्ये उद्रेक आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Arambol Land Conversions

हरमल: गोव्यात जमिनी रुपांतरण प्रश्‍न गाजत असून सपाट जमिनीबरोबरच प्रत्येक गावातील डोंगर,नदी, नाले तसेच ‘ना विकसित क्षेत्र’मध्ये जमिनीचे घाऊक पद्धतीने रुपांतरण चालूच आहे. याबाबत स्थानिकांमध्ये उद्रेक आहे. जमिनीच्या नोटीस टप्याटप्याने प्रसिद्ध होत असल्याने, जनेतचा उद्रेक होण्यापूर्वी भाजप सरकारने जनभावना ओळखून निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान,नगर नियोजन कायद्यातील सुधारित दोन कलमानुसार रुपांतरण होत आहे, हे अंत्यत चुकीचे असून, त्यात ग्रामस्थांच्या मताचा आदर करून सन्मानाने रूपांतरण रद्द करण्याची मागणी युवा वर्ग करीत आहे. परवाच्या ‘सेव्ह गोवा,सेव्ह सॉईल’, या जागृती बैठकीस राज्यातील अनेक संघटनाचे नेते उपस्थित राहिले. त्यात वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा सहभागी झाल्याने ग्रामस्थांच्या भूमिकेला योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी या पंचायत क्षेत्रातील वरचावाडा भटवाडी भागातील अंदाजे ३.५ लाख चौरस मीटर जमिनीचे रुपांतरण प्रक्रिया सुरू केली होती. गेल्या आठवड्यात नागरिकांनी आमदार जीत आरोलकर तसेच माजी मुख्यमंत्री तथा भटवाडी वाड्यावरील रहिवाशी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासमवेत बैठक घेतली व प्राणपणाने विरोध करण्याचे ठरले होते.ह्याशिवाय कायदेशीर पद्धतीने रुपांतरण प्रक्रिया बंद करण्याचे अंदाजे ३०० ग्रामस्थांच्या उपस्थितीत ठरले होते.

गेल्या आठवड्यात पंचायत ग्रामसभेत,सर्व्हे नंबर ३८ व ७२ मधील (नवीन सर्व्हे नंबरमधील )प्रस्तावित विकासकामांना विरोध करण्याचा एकमुखी ठराव मंजूर केला होता.त्यात अन्य तीन ठराव बहुमताने मंजूर केले होते. गावचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व भावी पिढीचे भवितव्य धोक्यात येऊ नये यासाठी सर्वांनी एकजुटीने विरोध करण्याची गरज असल्याची मागणी ग्रामस्थ आत्माजी नाईक, संतोष कोरकणकर यांनी केली होती. राज्यभरातून पाठिंबा असल्याने हरमलचा लढा राज्यभर पसरण्यास वेळ लागणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘वायनाड’सारखी स्थिती उद्‍भवण्याची भीती

दरम्यान, नुकतीच एका वृत्तपत्रात वीस हजार चौरस मीटर जमीन रुपांतरण बाबत नोटीस प्रसिद्ध झाली व ग्रामस्थ अस्वस्थ झाले. नगरनियोजन खाते उघडपणे स्थानिकांच्या हिताला तिलांजली देत असून, १७ बी,१९ ए,कायद्याचा वापर करून जमिनी परप्रांतीयांच्या घशात घातल्या असून,केरळच्या वायनाड सारखी स्थिती हरमल मध्ये घडण्याची भीती वाटत असल्याने ग्रामस्थ चवताळले असून आगामी आठ-पंधरा दिवसांत ग्रामस्थांतर्फे महत्वपूर्ण निर्णय जाहीर होण्याची चिन्हे असल्याचे एका ग्रामस्थाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT