Goa Made Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Made Liquor Seized: गोव्यातून कर्नाटकला दारू तस्करी, शक्कल लढवली पण... 12 लाखांचे मद्य जप्त

Liquor Smuggling: गोवा उत्पादन शुल्क विभागाने केरी चेकपोस्टवर कारवाई करत मंगळवारी सायंकाळी अंदाजे १२ लाख ६०० रुपयांचे मद्य घेऊन जाणारा कंटेनर अडवला.

Sameer Amunekar

वाळपई: गोवा उत्पादन शुल्क विभागाने केरी चेकपोस्टवर कारवाई करत मंगळवारी सायंकाळी अंदाजे १२ लाख ६०० रुपयांचे मद्य घेऊन जाणारा कंटेनर अडवला. या ट्रकमधून जवळपास ७०० दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले असून हे मद्य सत्तरी तालुक्यातच तयार झाल्याचा संशय आहे. बेकायदा मद्य कर्नाटकात बेकायदेशीररीत्या पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

अडवलेल्या ट्रकवर गोव्यातील नोंदणी क्रमांकाची प्लेट लावण्यात आली होती, जी बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासानुसार हा ट्रक कर्नाटकातून आलेला असण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी करण्यासाठी बनावट नंबरप्लेट्सचा वापर करण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत.

ही कारवाई वाळपई अबकारी खात्याचे निरीक्षक भोला हरमलकर, सहाय्यक उपनिरीक्षक सुशांत फडते, तसेच गाड जितेंद्र गावस, सखाराम पर्येकर, राजेंद्र नाईक, पांडुरंग पर्येकर, कृष्णा गावस यांच्या पथकाने केली.

वाहन ताब्यात घेऊन चालकाला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास वाळपई अबकारी विभाग करत आहे. पंचनामा करून ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT