Goa Excise Officer Aarrested Dainik Gomantak
गोवा

Illegal Liquor Smuggling: कुंपणच खाते शेत, बेकायदा दारुची वाहतूक करणाऱ्या गोवा अबकारी निरिक्षकाला कर्नाटकात अटक!

Goa Excise Officer Aarrested: राज्यात गेल्या काही दिवसांत बेकादेशीर दारुची वाहतूक मोठ्याप्रमाणात वाढली आहे. याच बेकादेशीर दारु वाहतूकीला आळा घालण्यासाठी गोवा पोलिस धडक कारवाया करत आहे.

Manish Jadhav

Goa Excise Inspector Arrested For Illegal Liquor Smuggling

राज्यात गेल्या काही दिवसांत बेकादेशीर दारुची वाहतूक मोठ्याप्रमाणात वाढली आहे. याच बेकादेशीर दारु वाहतूकीला आळा घालण्यासाठी गोवा पोलिस धडक कारवाया करत आहे. यातच आता, बेकायदेशीर दारुची वाहतूक करणाऱ्या गोवा अबकारी खात्याच्या अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आले आहे.

गोवा अबकारी खात्याच्या निरिक्षकाला अटक

दरम्यान, उत्तर कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील एका गावात बेकायदेशीर दारुची विक्री करणाऱ्या या अधिकाऱ्याला कर्नाटक पोलिसांनी रविवारी (16 मार्च) अटक केली. प्रमोद जुवेकर असे अटक केलेल्या गोवा अबकारी खात्याच्या निरिक्षकाचे नाव आहे. कर्नाटक (Karnataka) अबकारी विभागाने गोवा नोंदणी असलेल्या कारमधून 138.06 लीटर दारु जप्त केली. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या उपअधीक्षक शीला दर्जकर, निरिक्षक भाग्यलक्ष्मी, कर्मचारी संदीप, गुरुमूर्ती, दीपक, मल्लिकार्जुन आणि सचिन यांच्या पथकाने केली.

370 लिटर गोवा बनावटीची दारु जप्त

काही दिवसांपूर्वी, होळीच्या तोंडावर पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवा (Goa) बनावटीचा साठवून ठेवलेला दारुसाठा जप्त केला होता. खडेबाजार परिसरात पोलिसांनी ही धडक कारवाई केली होती. पोलिसांनी संशयितांना 10.30 लाखांचा मुद्देमालासह अटक केली होती. राकेश अनिक चौगले (वय 30, रा. न्यू गडशेड रोड, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव होते. त्याच्याकडून 370 लिटर गोवा बनावटीची दारु जप्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT