Damu Naik  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'ज्यांना रिपोर्ट पाठवायचं, त्यांना पाठवू', पांडुरंग मडकईकर यांच्या आरोपावर दामू नाईकांनी टाळलं बोलणं

Damu Naik On Bribery Case: माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी एका मंत्र्याला छोट्याशा कामासाठी गेल्याच आठवड्यात १५ ते २० लाख रुपये दिल्याचा आरोप केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Ex Minister Pandurang Madkaikar Bribery Allegation BJP Response

पणजी: माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी एका मंत्र्याला छोट्याशा कामासाठी गेल्याच आठवड्यात १५ ते २० लाख रुपये दिल्याचा आरोप केला. त्यांना भाजपकडून याचा जाब विचारला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ज्यांना याबाबत अहवाल पाठवायचा आहे, त्यांना तो पाठवला जाईल, असे सांगत हा विषय निकाली काढला. भारतीय जनता महिला मोर्चाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमाला आलेल्या नाईक यांना याबाबत विचारले असता, यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्ष घातले असून ते योग्य ती कृती करतील, असे सांगून त्या विषयापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला.

आता केवळ वीजमंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनीच मडकईकर यांची भेट घेतो, असे म्हटले आहे. मडकईकर यांनीही आपला सूर काहीसा नरम केला आहे. भाजप सोडताना त्या मंत्र्याचे नाव आपण जाहीर करू, कॉंग्रेस, गोवा फॉरवर्डचा आपल्याला पर्याय आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आता त्यांना पक्षशिस्तीची आठवण आली असून पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच नाव जाहीर करण्याविषयी निर्णय घेऊ, असे ते सांगू लागले आहेत.

दरम्यान, संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) आणि काशिनाथ शेटये वादात दामू यांनी संकल्प यांची बाजू घेताना शेवटी सरकार हे जनतेसाठी असते. त्यामुळे आमदारांनी जनतेसाठी एखादी भूमिका घेण्यात काहीच चूक नसल्याचे नमूद केले. पर्वरी येथील श्रीदेव खाप्रेश्वराचे मंदिर सरकार बांधून देणार असल्याचे त्यांना जाता जाता नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस झोपेच्‍या मोडमध्‍ये

Arvind Kejriwal Mayem: '..तर मयेवासीयांची पारतंत्र्यातून मुक्तता'! जमीन मालकी हक्कावरुन काय म्हणाले केजरीवाल? Video

Varsha Usgaonkar: 'गोवा हे माझे घर... गोमंतकीय ही माझी माणसे'! अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी उधळली स्तुतीसुमने

Narendra Modi: गोव्याच्या श्रुती आणि रोहितने जिंकले PM मोदींचे मन! म्हापसा ITIचे टॉपर्स; नवी दिल्लीतील विज्ञान भवनात गौरव

‘तुला गोव्‍याचा राखणदार व्‍हायचे आहे का'? चाकू दाखवला, मारायला सुरुवात केली; हल्ल्‍यादिवशी नेमके काय घडले? काणकोणकरांनी दिला जबाब

SCROLL FOR NEXT