manohar babu ajgaonkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: शो मस्ट गो ऑन! गोव्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी ठोकला शड्डू, पुन्हा पेडण्यातून लढणार

Goa Assembly Election 2027: बाबू आजगावकर पुन्हा पेडण्यात येणार नाहीत, अशी एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

Pramod Yadav

पेडणे: गोवा विधानसभेची निवडणूक दोन वर्षे लांब असली तरी प्रत्येक मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. पराभूत उमेवार आगामी विधानसभेसाठी प्लॅन तयार करतायेत. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव, दीपक ढवळीकर यांच्यानंतर आता माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांनी त्यांची आगामी निवडणुकीबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पेडण्यातून पराभव पत्कारावा लागलेल्या बाबू आजगावकरांनी २०२७ मध्ये पुन्हा पेडण्यातून निवडणूक लढणार असल्याचा पुनुरुच्चार केला. आजगावकर पुन्हा पेडण्यात येणार नाहीत, अशी एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला.

बाबू आजगावर २०२७ मध्ये १०० टक्के पेडण्यातून उमेदवारी अर्ज भरतील. अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. शो मस्ट गो ऑन म्हणत आजगावकरांनी निवडणुकीबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले.

यापूर्वी देखील बाबू आजगावरकरांनी पेडण्यातून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले होते. पेडण्यात अनेक विकासकामे केल्याचा दावा त्यांनी केला होता. मोपा विमानतळ, आयुर्वेदीक हॉस्पीटल आणि महाविद्यालय यासारखे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले होते. मी भाजपचा सच्चा कार्यकर्ता असून, तिकीट देण्याबाबत पक्षाने विचार करावा, असेही त्यांनी म्हटले होते.

पेडण्यात सध्या भाजपचे प्रवीण आर्लेकर आमदार आहेत. २०२७ मध्ये आर्लेकर देखील तिकीटावर निश्चितपणे दावा सांगतील. तसेच, आजगावर देखील भाजपचे नेते असून, त्यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय.

त्यामुळे २०२७ मध्ये तिकीटाचा पेच भाजपसमोर उभा राहणार. दरम्यान, पक्षाने तिकिट नाकारल्यास दुसऱ्या पर्यायाचा विचार करणार असल्याचे आजगावकरांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT