
Russian Women Goa Viral Video
मोरजी: परदेशी नागरिकांचे भारतीयांना नेहमीच आकर्षण असते. देशातील प्रसिद्ध पर्यटन ठिकाणांवर विदेशी पर्यटक नेहमीच गर्दी करत असतात. गोव्यात आलेल्या विदेशी पर्यटकांसोबत फोटो आणि अलिकडे रिल्स करण्याचे फॅड भारतीयांमध्ये पाहायला मिळते. पण, सेल्फीसाठी विनंती करणाऱ्या भारतीयांना कंटाळून रशियन महिलेने अजब बिझनेस फंडा शोधून काढला आहे.
अंजेलिना या महिलेने Instagram वर याबाबत गोव्यातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. भारतातील समुद्रकिनाऱ्यांवर आल्यानंतर कोणत्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर, ती समस्या म्हणजे सेल्फी असल्याचे तिने म्हटले आहे.
भारतीय लोक 'मॅडम एक फोटो', 'एक सेल्फी', असे म्हणत मागे पडतात म्हणून या पर्यटक महिलेने सेल्फीसाठी चक्क पैसे गोळा करण्याचा उद्योग सुरु केला आहे. विशेष म्हणजे भारतीय पर्यटक देखील या महिलेला सेल्फीसाठी पैसे देतायेत.
रशियन पर्यटक अंजेलिना सध्या गोव्यात पर्यटनासाठी आली आहे. गोव्यात मोरजी बीचवर असतानाचा तिने एक व्हिडिओ Instagram वर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अंजेलिना हातात एक सेल्फीसाठी 100 रुपये, असा फलक घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. तिच्याकडे येणारे पर्यटक सेल्फीसाठी १०० रुपये देऊन सेल्फी काढताना दिसत आहेत.
मोरजी, हरमल, केरी, वागातोर, हणजूण या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर रशियन पर्यटक गर्दी करत असतात. या पर्यटकांसोबत सेल्फी किंवा व्हिडिओसाठी विनंती करणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या देखील अधिक असते. विदेशी पर्यटकांच्या आकर्षणापोटी भारतीय पर्यटक सेल्फीची मागणी करतात. पण, यामुळे त्रस्त झालेल्या रशियन पर्यटक महिलेने ही अनोखी शक्कल लढवली आहे.
अंजेलिनाच्या Instagram बायोवरुन ती व्लॉगिंग देखील करते असे तिने म्हटले आहे. गोव्यातील अनेक व्हिडिओ तिने Instagram वरुन शेअर केले आहेत. अंजेलिनाला Instagram वर १७ हजार फॉलोवर्स आहेत. तर, तिच्या सेल्फीच्या या व्हिडिओला ३.२ मिलियन व्ह्यूज मिळाल्या आहेत तर ९२ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.