Goa: Trawler plowing at Kutban jetty.
Goa: Trawler plowing at Kutban jetty. Goa: Dainik Gomantak 20 Aug. 2020 Photo
गोवा

Goa: २० दिवसानंतरही मासेमारी मोसमाला गती येईना

Sandeep Survekamble

गोव्यात मासेमारी हंगाम सुरू होऊन दिवस उलटूनही राज्यातील मासेमारीने अपेक्षित गती घेतलेली नाही. डिझेलचे वाढलेले दर, कामगारांची कमतरता आणि खराब हवामानाचा फटका बसल्याने अजूनही ७० टक्के ट्रॉलर तडीवरच नांगरलेल्या अवस्थेत दिसतात. (Trawler plowing at Kutban jetty.) गोव्यातील सर्वात मोठी जेटी असलेल्या कुटबण (kutban) येथील बोटमालक संघटनेचे अध्यक्ष फ्रांको मार्टिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४० टक्के ट्रॉलरच पाण्यात उतरले असून, निम्म्यापेक्षा अधिक ट्रॉलर तडीवरच नांगरलेल्या अवस्थेत आहेत. (So far, only 40% of the trawlers have been submerged and more than half of the trawlers are still plowing.) खवळलेल्या दर्यात (In the turbulent valley) काही जणांनी ट्रॉलर घालण्याचे प्रयत्न केले; पण लाटांच्या तडाख्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले. (They were hit hard by the waves.) तर दोन खलाशांचा मृत्यूही झाला असे त्यांनी सांगितले. (Martins said, two sailors also died.)

मालिम जेटीवर त्याहूनही अधिक कठीण परिस्थिती असून, या जेटीवरून फक्त ५ ते १० टक्के ट्रॉलरच पाण्यात उतरले आहेत. कामगार अजून न आल्याने नाईलाजाने हे ट्रॉलर बंद ठेवण्याची वेळ आली आहे, अशी माहिती मांडवी मासेमारी सहकारी सोसायटीचे सदस्य फ्रान्सिस फर्नांडिस यांनी दिली. फर्नांडिस म्हणाले, वास्तविक परराज्यातील कामगार १५ ऑगस्टपर्यंत गोव्यात पोहोचतात त्यानंतर राज्यात मासेमारीला गती येते; मात्र यावेळी कामगार अजून पोहोचले नाहीत त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकेल.

मागच्या वर्षी मच्छीमार बांधवांचा मोसम कोविडमुळे वाया गेला होता. यावेळी कोविडचा उद्रेक कमी असला तरी कामगार मिळत नसल्याने मच्छिमार हवालदिल झाले आहेत. गोव्यात या व्यवसायातील कामगार झारखंड मधून येतो; मात्र यावेळी रेल्वे पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने कामगारांना खास बस पाठवून गोव्यात आणावे लागते. यासाठी एका माणसामागे किमान ६ हजार रुपये खर्च येतो. एक बस पाठवायला किमान २ लाख रुपये खर्च येतो, अशी माहिती मच्छिमार बांधवांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT