Chapora River Illegal Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Mining: म्हादई नदीतून बेकायदेशीर रेती उपसा बिनधोकपणे सुरुच; सरकारी यंत्रणेच्या डोळ्यावर पट्टी!

Rajendra Kerkar warns against sand mining in Mhadei River: म्हादई नदीत रेती उपसा करण्यास मुभा दिल्यास त्याचे दूरगामी दुष्परिणाम घडतील, अशी भीती पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

सत्तरी: सत्तरी तालुक्यात म्हादई नदी व उपनद्यांमध्ये बेकायदेशीरपणे रेती उपसा बिनधाकपणे केला जातो आहे. दहा दिवसांपूर्वी सावर्डे सत्तरीत अशाच बेकायदा रेती उपसा करताना म्हादई नदीत बुडून एका महिलेने जीव गमावण्याची गंभीर घटना घडली. म्हादई नदीत रेती उपसा करण्यास मुभा दिल्यास त्याचे दूरगामी दुष्परिणाम घडतील, अशी भीती पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली.

नदीच्या पात्रात जाऊन होडीव्दारे रेती काढण्यासाठी गेली असता बोट उलटून दुर्घटना घडली होती. पण ही अत्यंत गंभीर गोष्ट बनली असून खरे तर सरकारी यंत्रणेने अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कडक कारवाईची गरज बनली आहे. पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर (Rajendra Kerkar) म्हणाले, सत्तरी तालुक्यात म्हादई आणि उपनद्यांच्या पात्रातील, रेती, दगड यांचे उत्खनन केले जात आहे. त्याचे गंभीर दूरगामी दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. नदीतील मत्स्य संपदेबरोबरच काठांवर सुरक्षा कवच असणारे शेरनी आणि अन्य वृक्ष उन्मळून पडत असल्याने नदी आपला प्रवाह बदलत आहे.

सोनाळ, सावर्डे, कोदाळ, वेळगे, कुडशे आदी सत्तरीच्या भागातील गावात बेकायदेशीररित्या रेती व्यवसाय दिवसाढवळ्या चालू असून यासंदर्भात खाण-खाते, वनखाते,मामलेदार, जलस्रोत खाते आदी सरकारी यंत्रणेला अवैध व्यवसायाची माहिती असूनही ठोस कारवाईस ही यंत्रणा हेतूतः दुर्लक्ष करीत आहे.

म्हादई नदीच्या (Mhadei River) अस्तित्वावर बेकायदेशीर रेती व्यवसायाने घाला घातलेला आहे. रेती व्यवसाय करीत असताना आता मानवाच्या जीवाला देखील धोका वाढलेला आहे. या म्हादई नदीच्या पात्रात मोठ मोठे डोह असून माणूस एकदा बुडाला की त्याचा शोध घेणे कठीण होऊन जाते. बेकायदेशीर व्यवसायामुळे पर्यावरणावरील परिणामा बरोबरच आता मनुष्याच्या देखील जीवावर बेतले आहे, असे राजेंद्र केरकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT