Goa film Festival  Gomantak Digital Team
गोवा

Environmental Film Festival : पर्यावरणीय चित्रपट महोत्सवाचे पोस्टर लाँच

नीलेश काब्राल : 3 ते 5 जून दरम्यान 50 आंतरराष्ट्रीय चित्रपटांची पर्वणी

गोमन्तक डिजिटल टीम

भारताच्या अध्यक्षतेखालील होणाऱ्या जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर 3 ते 5 जून पहिल्या गोवा पर्यावरणीय चित्रपट महोत्सव पणजीत आयोजित केला आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.या चित्रपट महोत्सवाचे पोस्टर आज पणजीत लॉँच करण्यात आले. यावेळी जी.२० नोडल अधिकारी संजीत रॉड्रिग्स उपस्थित होते.

मंत्री काब्राल म्हणाले आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आणि जी २० परिषदेचा एक भाग म्हणून 3 ते 5 जून या काळात हा  महोत्सव  होणार आहे. ओल्ड जीएमसी संकुलात गोवा मनोरंजन सोसायटी - मॅकेनेस पॅलेस येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा हा महोत्सव पहिला असला तरी यापुढे हा महोत्सव कायम करण्याची घोषणा पर्यावरण मंत्री काब्राल यांनी केली आहे.

50 चित्रपटांची मेजवानी

महोत्सव काळात जगभरातील 50 हून अधिक चित्रपट पाहायला मिळणार असून ओमान, पोर्तुगाल, फिनलंड, आर्यलंड, रशिया क्रोएशिया, स्पेन या देशातून पर्यावरणीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती संजीत रॉड्रिग्स यांनी दिली. या महोत्सवाची पूर्वनोंदणी सर्वांसाठी खुली आणि मोफत असून ती करणे अनिवार्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT