Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

Business In Goa: राज्‍यात उद्योगांसाठी चांगले वातावरण गरजेचे! मंत्री गुदिन्‍होंचे प्रतिपादन; महिला, ग्रामीण उद्योजकांचे महत्व अधोरेखित

Mauvin Godinho: ‘असोचॅम’च्या गोवा परिषदेने सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी ‘क्षमता, संधी व पुढील वाटचाल’ विषयावरील कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी गुदिन्हो बोलत होते

गोमन्तक डिजिटल टीम

Mauvin Godinho About Business In Goa

पणजी: राज्यात उद्योजकांना सक्षम करणारे, नावीन्याला चालना देणारे आणि वित्तीय-तंत्रज्ञानाला सुलभ प्रवेश मिळवून देणारे व्यवसायस्नेही वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे, असे उद्‌गार उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी येथे काढले.

‘असोचॅम’च्या गोवा परिषदेने सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी ‘क्षमता, संधी व पुढील वाटचाल’ विषयावरील कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी महिला उद्योजकता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

नाबार्डचे महाव्यवस्थापक संदीप धारकर यांनी ग्रामीण औद्योगिकीकरणाला आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा घटक म्हणून अधोरेखित केले.

ग्रामीण भागातील लोकसंख्येचे कौशल्य वाढवणे, पायाभूत सुविधा सुधारणे, नागरिकांमध्ये समान संधी निर्माण करणे आणि महिलांचे सक्षमीकरण यावर त्यांनी भर दिला.

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विभागाचे सहसंचालक एम. के. मीना यांनी हे क्षेत्र सशक्त करण्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. असोचॅमच्या गोवा परिषदेचे प्रमुख मांगिरीश पै रायकर, डॉ. सागर साळगावकर दीपाली नाईक यांची उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT