Cement Dainik Gomantak
गोवा

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: राज्यातील अभियंता निपुणतेला प्राधान्य देताना अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोमन्तक टीव्हीतर्फे ‘इंजिनिअर्स डे’ निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात फर्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकलेल्या विद्यार्थ्यांकडून दोन प्रकल्पांपैकी एकाला प्रथम तर दुसऱ्याला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

दोन्ही प्रकल्प राज्याच्या विकासाच्यादृष्टीने हितकारक असून भविष्यात या दोन्ही प्रकल्पांमुळे संबंधित क्षेत्रात नवीन क्रांतीच घडू शकते.

या दोन प्रकल्पांपैकी अव्वल स्थान मिळवलेला ‘इको ग्रीन सिमेंट'' हा प्रकल्प बांधकाम क्षेत्रासाठी वरदान ठरणारा आहे. दुसरा प्रकल्प हा राज्याच्या जिओ मॅपिंगमध्ये मोलाचे मार्गदर्शन करू शकतो, म्हणून या दोन्ही प्रकल्प निर्मितीसाठी झटलेल्या अभियंत्यांचे अभिनंदन करायलाच हवे.

इको ग्रीन सिमेट या प्रकल्पासाठी पीएचडीप्राप्त विद्यार्थिनी श्रद्धा महादेव आणावकर यांनी भरीव परिश्रम घेतले आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील श्रद्धा आणावकर यांनी आपल्या परिश्रमाला कल्पकतेची जोड देत बांधकाम क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या सिमेंटची निर्मिती करण्यावर भर दिला आहे.

विशेष म्हणजे सिमेंटमधील पार्टिकल्स विभागून त्यातून एखाद्या बांधकामस्थळी लागणाऱ्या काँक्रिटमध्ये गरजेपेक्षा कमी आणि दर्जेदार सिमेंट उपलब्ध करून देण्याचा हा प्रकल्प असून त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील खर्चाचा आकडाही कमी होणार आहे.

काँक्रिटमध्ये हे सिमेंट वापरताना त्यात पाणी कमी लागणार आहे. शिवाय सिमेंटही कमीच वापरता येणार आहे. साधारण वीस ते पंचवीस टक्के कमीचे प्रमाण त्यात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे सिमेंटचा दर्जा उच्च राखताना त्यात कणखरपणा कसा येईल, याकडे कटाक्ष ठेवण्यात आला असून अशा सिमेंट वापराचा खर्चही कमी येणार आहे.

सध्या जेके सिमेंट कंपनीत या सिमेंटचा वापर होत असून वापरण्यास सुयोग्य, कमी खर्चात कमी पाण्यात हे काँक्रिट भरभक्कम निकाल देण्यायोग्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

`जीआयएस''च्या निर्मितीसाठी काकोडकर यांचे मार्गदर्शन

`जीआयएस''च्या निर्मितीसाठी क्लेरिटा डिसोझा यांच्यासह एंजेल रॉड्रिगीस, रोहन व्हिएगस, राशेल फर्नांडिस यांनी भरीव काम केले आहे. त्यांना प्रा. सत्येश काकोडकर यांचे उपयुक्त मार्गदर्शन लाभल्यामुळे हा प्रकल्प साकारला आहे.

प्रा. सत्येश काकोडकर यांच्या अनुभवसिद्धतेमुळे हा प्रकल्प साकारणे क्लेरिटा डिसोझा व इतरांच्या अथक प्रयत्नांमुळे सयुक्तिक ठरले.

डॉ. के. जी. गुप्ता यांचे मार्गदर्शन

या अत्याधुनिक सिमेंट प्रकल्पाच्या निर्मितीसाठी श्रद्धा आणावकर यांना डॉ. के. जी गुप्ता यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. संबंधित क्षेत्रातील अनुभवसिद्ध म्हणून डॉ. के. जी. गुप्ता यांची ओळख असल्याने श्रद्धा आणावकर यांना ते उपयुक्तच ठरले आहे. श्रद्धा आणावकर यांच्या प्रयत्नांना कल्पकतेची जोड मिळाल्याने के. जी. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वी ठरला आहे.

जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टमची (जीआयएस) निर्मिती!

तिसरा क्रमांक मिळवलेला जिऑग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम'' हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे मॅपिंग पद्धतीने गोवा राज्याच्या अर्बन प्लॅनिंगला उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील विशेषतः शहरांच्या बदलत्या विकासासाठी या प्रकल्पाची भरीव मदत होणार आहे.

गोवा हे पर्यटनस्थळ असून राज्यात देशी विदेशी पर्यटक लाखोंच्या संख्येने येतात. अशावेळी राज्यातील साधनसुविधा सुविहित होण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. हा केवळ डाटा नाही तर भविष्यात राज्याच्या विकासासाठी साधनसुविधांचा वापर करण्यासाठी इंटेलिजंट डाटा ठरणार आहे.

पाणी, वीज, मलनिस्सारण आदींच्या सुविहित व्यवस्थापनासाठी ‘जीआयएस'' महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मूलभूत सुविधांचा अद्ययावत डाटा उपलब्ध होणार असल्याने शहराचे नियोजन चांगल्या प्रकारे केले जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT