Honeymoon Couple On Beach Canva
गोवा

Honeymoon Destination: देशात ‘मधुचंद्रा’साठी गोवा परफेक्ट! सर्वेक्षणात मिळाली सर्वाधिक पसंती, पाहा यादीतील इतर नावे

Honeymoon Destination Goa: मधुचंद्रासाठी गोव्याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. यंदा मधुचंद्राच्या कलांनुसार ६० भारतीय जोडपी देशांतर्गत ठिकाणांना प्राधान्य देत आहेत. त्यात गोव्याला पहिली पसंती मिळाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मधुचंद्रासाठी गोव्याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. यंदा मधुचंद्राच्या कलांनुसार ६० भारतीय जोडपी देशांतर्गत ठिकाणांना प्राधान्य देत आहेत. त्यात गोव्याला पहिली पसंती मिळाली आहे.

‘वेड मी गुड विवाह’ नियोजन करणाऱ्या ॲपद्वारे घेतलेल्या सर्वेक्षणात गोवा, मनाली, केरळ, शिमला आणि ईशान्य भारत ही सर्वाधिक पसंतीस उतरलेली ठिकाणे ठरली आहेत.

या सर्वेक्षणात साडेतीन ‌हजारांहून अधिक जोडपी आणि ५०० हून अधिक वेडिंग व्हेंडर्सचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार, ४० टक्के भारतीय जोडपी आंतरराष्ट्रीय ठिकाणांना पसंती देत असून युरोप, तुर्कस्तान, थायलंड, बाली, मालदीव आणि मॉरिशस या ठिकाणांना प्राधान्य देत आहेत.

या ॲप सर्वेक्षणात ३१ टक्के उत्तरदात्यांनी त्यांच्या मधुचंद्रासाठी ५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चाची तरतूद केल्याची माहिती उघड झाली. ‘मिनिमून’ आणि ‘स्टेकेशन’ सारख्या ट्रेंडमुळे गोवा आणि केरळसारख्या देशांतर्गत ठिकाणांची मागणी वाढली आहे.

जागतिक स्तरावर प्रसिद्धी

भारतात दरवर्षी ८-१० दशलक्ष लग्न होत असून, या क्षेत्रामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होत आहे. यंदा फक्त ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातच ४.८ दशलक्ष लग्न होऊन ६ लाख कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. भारतीय लग्नांचा थाटमाट, परंपरा आणि आधुनिकतेचे अनोखे मिश्रण, तसेच ‘वेड इन‌ इंडिया’ सारख्या उपक्रमांमुळे भारत जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे पर्यटन व विवाह स्थळ म्हणून पुढे येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT