Elvis Gomes 
गोवा

Goa: एल्विस गोम्स आणि बेंजामिन सिल्वा ही काँग्रेसच्या वाटेवर

वेळ्ळीचे माजी आमदार बेंजामिन सिल्वा (Benjamin Silva) हेही काँग्रेस पक्षात (Congress Party) प्रवेश करण्याच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने काँग्रेस गोटात जोर धरला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको (Mickey Pashko) यांनी येत्या आठवड्यात आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असे जाहीर केलेले असतानाच माजी नोकरशहा एल्विस गोम्स (Elvis Gomes) आणि वेळ्ळीचे माजी आमदार बेंजामिन सिल्वा (Benjamin Silva) हेही काँग्रेस पक्षात (Congress Party) प्रवेश करण्याच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने काँग्रेस गोटात जोर धरला आहे.

कुंकळ्ळी आणि वेळ्ळी येथील काँग्रेस आमदार क्लाफास डायस व फिलिप नेरी रोड्रिग्स यांनी भाजपात प्रवेश केला असल्याने या दोन्ही मतदारसंघात पर्याय म्हणून गोम्स व सिल्वा या दोघांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याचे ठरले आहे असे सांगण्यात येत आहे. यापैकी गोम्स हे गोवा सरकारच्या सेवेतील माजी नोकरशहा असून 2017 च्या निवडणुकीत त्यांनी आपच्या उमेदवारीवर कुंकळ्ळीतून निवडणूक लढविली होती तर सिल्वा हे 2012 च्या निवडणुकीत वेळ्ळीतून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.

गोम्स यांच्या काँग्रेस प्रवेशाला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविला असून मागे काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव हे गोव्यात आले होते त्यावेळी गोम्स यांनी त्यांची भेटही घेतली होती. सिल्वा याना काँग्रेस पक्षात घेण्यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न चालविले आहेत.

गोम्स आणि सिल्वा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास स्थानिक गणिते बिघडण्याची शक्यता असून सध्या कुंकळ्ळीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून युरी आलेमाव याना प्रोजेक्ट केले जात असून वेळ्ळीची उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस आणि वेळ्ळीचे सरपंच सावियो डिसिल्वा यांनी प्रयत्न चालविला आहे. गोम्स आणि सिल्वा याना काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्यास त्यांच्या आशेवर पाणी फेरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT