Goa border elephants Dainik Gomantak
गोवा

Goa Elephant News: गोव्याच्या सीमेवर 10 हत्ती! सत्तरीतून घुसण्याचा धोका; वन खाते हवालदिल, नागरिकांत घबराट

Goa border elephants: राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक कमल दत्ता यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की कर्नाटकच्या वन खात्याकडून या १० हत्तींच्या हालचालींची माहिती घेण्यात येत आहे.

Sameer Panditrao

पणजी: महाराष्ट्रातून गोव्यात घुसलेला ओंकार हा रानटी हत्ती परत महाराष्ट्रात गेल्याने सुटकेचा सुस्कारा सोडलेल्या वन खात्यासमोर कर्नाटकातील १० हत्तींच्या कळपाचे संकट घोंगावू लागले आहे. या संकटाचा कसा सामना करावा, यासाठी वन खात्याने उपाययोजना करणे सुरू केले आहे.

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक कमल दत्ता यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की कर्नाटकच्या वन खात्याकडून या १० हत्तींच्या हालचालींची माहिती घेण्यात येत आहे.

सत्तरी तालुक्याला लागूनच हा भाग असल्याने तेथून गोव्यात हे हत्ती येऊ शकतात, असे गृहित धरून हत्तींच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. दरवर्षी हत्ती त्या भागात येत असावेत. तरीही गोव्यात हे हत्ती घुसू नयेत, यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दांडेलीच्या जंगलातून दरवर्षीप्रमाणे यंदाही हत्तींच्या कळपाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात हजेरी लावली आहे.

नागरगाळी वन परिक्षेत्रात तब्बल दोन कळप दाखल झाल्याने स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोव्याच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटरवर हे हत्ती सध्या वावरत असल्याने ते कधीही गोव्याच्या हद्दीत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हत्तीचे पिल्लू बिथरले : आक्रमक होण्याची भीती

चार हत्तींचा एक कळप चार दिवसांपासून गोधोळी परिसरात ठाण मांडून आहे. दुसरा पाच हत्तींचा कळप करजगीपर्यंत पोहोचला असून त्याची वाटचाल नंदगडच्या दिशेने सुरू आहे. या कळपांमध्ये एक लहान पिल्लू असल्याने ते अधिक बिथरलेले असून, हल्ला करण्याची शक्यता वनअधिकाऱ्यांनी नाकारलेली नाही. वनकर्मचारी हत्ती परत जंगलात पिटाळून लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत; तरीही आतापर्यंत यश आलेले नाही.

गोव्याच्या सीमावर्ती भागात असलेले हत्ती कुठल्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत, याची माहिती कर्नाटक वन खात्याकडून घेतली जात आहे. हे हत्ती गोव्यात येऊ नयेत, यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.

- कमल दत्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT