Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity Projects: वीज खात्यातर्फे राज्यात 8 हजार कोटींची कामे! बादेत वीज उपकेंद्र, भूमिगत वाहिन्यांचे काम सुरू

Sudin Dhavalikar: बादे, आसगाव येथे सबस्टेशन व भूमिगत वीज वाहिनी घराण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर वीज मंत्री सुदिन ढवळीकर बोलत होते.

Sameer Panditrao

कळंगुट: वीज खात्यामार्फत संपूर्ण गोव्यात सध्या आठ हजार कोटींची कामे सुरू आहेत. यात ११ केव्ही, ३३ केव्ही भूमिगत वीज वाहिनी घालणे, सब स्टेशन उभारणे व अपग्रेशन तसेच ट्रान्सफॉर्मरचे अपग्रेशन आदींचा समावेश आहे, असे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

बादे, आसगाव येथे सबस्टेशन व भूमिगत वीज वाहिनी घराण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस, हणजूण जिल्हा पंचायत सदस्य तथा उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष निहारिका मांद्रेकर, शिवोली जिल्हा पंचायत सदस्य सनिशा तोरस्कर, ओशेलच्या सरपंच अॅड. रेषल आरापोरकर, सडयेच्या सरपंच दीपा पेडणेकर, आसगावचे सरपंच हनुमंत नाईक आदी उपस्थित होते.

ढवळीकर यांनी पुढे सांगितले की, ज्यांचे घर स्लॅबचे आहे व ज्यांना वीज जास्त प्रमाणात लागते, त्यांनी सोलर योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेमुळे पुढील पाच वर्षांत विजेचा वापर मोफत होऊन जाईल, असे ते म्हणाले.

या नवीन सबस्टेशननंतर मतदारसंघातील वीज समस्या काही प्रमाणात सुटणार आहे. वीज खात्यातर्फे सध्या या मतदारसंघात ९० कोटीची कामे सुरू असल्याचे आमदार डिलायला लोबो यांनी सांगितले. मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी कामकाजाबाबत माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT