Tuem Daily Gomantak
गोवा

वीज केबल न टाकताच खोदलेला खड्डा बुजवला; आता पुन्हा खोदकाम, तुयेत वीज खात्याच्या सावळा गोंधळ

केबल टाकली नसल्याने आता पुन्हा हा रस्ता खोदण्याची नामुष्की आली आहे.

Pramod Yadav

Tuem: तुये गावात अखंडीत वीज पुरवठा सुरू व्हावा यासाठी तेथे लाईन टाकण्यासाठी रस्ता खोदला खरा पण, त्यात 11 केव्हीची केबल टाकलीच नसल्याने वीज खात्याचा सावळागोंधळ समोर आला आहे.

खोदलेला रस्ता बंद केल्यानंतर आता पुन्हा केबल टाकण्यासाठी रस्ता खोदावा लागणार असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ऐन पावसाळ्यात तुये गावात वीज केबल टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला. खोदलेला रस्ता बंद केल्यानंतर त्यावर हॉट मिक्सिंग करुन रस्ता पूर्ववत होईल अशी अपेक्षा गावकऱ्यांची होती. पण, खोदलेल्या मार्गात वीज खात्याने 11 केव्हीची केबल टाकण्यास वीज खाते विसरले आणि खोदलेला मार्ग तसाच बंद केल्याची धक्कादायक बाब समोर आली.

केबल टाकली नसल्याने आता पुन्हा हा रस्ता खोदण्याची नामुष्की आली आहे. वीज खात्याने अक्षम्य दुर्लेक्ष केल्याचा फटका स्थानिकांना बसला आहे. अखंडीत वीज नाहीच शिवाय रस्ताही मागील बऱ्याच दिवसांपासून वाहतूक योग्य नसल्याची तक्रार स्थानिक करत आहेत.

रस्ता पूर्वीपासून खराब स्थितीत होता तरीही गावकरी त्याच रस्त्याने नाईजास्तव प्रवास करत होते. गावात अखंडीत वीज पुरवठा व्हावा या उद्देशाने खोदलेल्या खड्यात ११ केव्हीची केबल टाकली नसल्याने वीज खात्याच्या कारभारावरही टीका केली जात आहे.

दरम्यान, वीज खात्याने झालेल्या चुकीची जबाबदारी घेतली आहे. खोदलेल्या खड्यात 33 केव्हीची केबल टाकण्यात आली मात्र, अनावधानाने 11 केव्हीची केबल टाकण्याची राहिली. खात्याच्या वतीने लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

History: कर्नाटक, महाराष्ट्र ते आंध्र: सहा शतके दख्खनवर अधिराज्य गाजवणाऱ्या 'चालुक्य' घराण्याची शौर्यगाथा

SCROLL FOR NEXT