Electricity Bill  Dainik Gomantak
गोवा

Electricity Bill Scam In Goa: अखेर सात साक्षीदारांचा पत्ता शोधण्‍यात क्राईम ब्रँचला यश, पुढील सुनावणी 'या' दिवशी होणार

11 साक्षीदारांचा पत्ताच सापडत नसल्‍याने मागच्‍यावेळी ही सुनावणी तहकूब केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Electricity Bill Scam In Goa विद्यमान पंचायतमंत्री माविन गुदिन्‍हो यांचा कथित सहभाग असलेल्‍या ४.५७ कोटींच्‍या वीज बिल सवलत घोटाळा प्रकरणातील ११ साक्षीदारांचा पत्ताच सापडत नसल्‍याने मागच्‍यावेळी ही सुनावणी तहकूब केली होती.

अखेर त्‍यातील सात साक्षीदारांचा पत्ता शोधून काढण्‍यात क्राईम ब्रँचला यश आले असून या साक्षीदारांना नव्‍याने समन्‍स जारी करण्‍यात येणार आहेत.

साक्ष पटविली

पणजी पोलिस स्‍थानक हल्‍लाप्रकरणी उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी मागच्‍या सुनावणीवेळी या हल्‍ल्‍यात मोडतोड झालेल्‍या एका गाडीची साक्ष पटविली होती.

त्‍या गाडीचे फोटो आज (शुक्रवारी) त्‍यांनी न्‍यायालयात ओळखले. या प्रकरणात बाबूश मोन्‍सेरात, त्‍यांच्‍या पत्‍नी जेनिफर मोन्‍सेरात यांच्‍यासह ३७ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.

राजकीय नेत्यांच्या विरोधातील खटले हाताळणारे खास न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍या न्‍यायालयात पोलिसांनी आज ही माहिती दिली. सरकारी सेवेत असताना त्‍यांना या प्रकरणात साक्षीदार केले हाेते. मात्र, नोकरीतून निवृत्त झाल्‍यानंतर त्‍यांचा पत्ता बदलला. त्‍यामुळे ते सापडू शकले नव्‍हते.

अजूनही चार साक्षीदारांचा पत्ता सापडलेला नाही. त्यांना साक्षीतून वगळण्‍याचा निर्णय घेतला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ ऑगस्‍ट रोजी होणार आहे.

दरम्‍यान, पणजी पोलिस स्‍थानक हल्‍ला प्रकरणातील सुनावणीही न्‍या. आगा यांच्‍यासमोर आज घेण्‍यात आली. या प्रकरणातील तपास अधिकारी, पणजीचे उपअधीक्षक सुदेश नाईक यांची सरतपासणी पूर्ण झाली असून २५ ऑगस्‍ट रोजी संशयितांच्‍या वकिलांकडून त्‍यांची उलटतपासणी घेतली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT