Digambar Kamat And Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

2027 मध्ये गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देऊ, मंत्रिपदाची शपथ घेताच कामत, तवडकरांची हमी; लोबो दाम्पत्य, गावडे, बाबुशची कार्यक्रमाला दांडी

Goa Politics: रमेश तवडकर यांनी गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी सकाळी विधानसभेत जाऊन सचिव नम्रता उल्मन यांच्याकडे सभापतीपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पक्षाने दिलेल्या मंत्रिपदाच्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देऊन आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देऊ, अशी हमी नवनिर्वाचित मंत्री दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

दोनापावला येथील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये गुरुवारी आयोजित भव्यदिव्य कार्यक्रमात राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी कामत आणि तवडकर या दोघांना मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री दिगंबर कामत म्हणाले, तेरा वर्षांनंतर भाजपने आपल्याला पुन्हा एकदा मंत्री बनण्याची संधी दिली. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे आभार मानतो.

यापुढील काळात मंत्री म्हणून आपण जनतेची प्रामाणिकपणे सेवा करू. तसेच मंत्रिपदाचा फायदा घेत आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाला अधिकाधिक बळकटी मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी नमूद केले.

२०१२ ते २०१७ या काळात आपण मंत्री होतो. त्यानंतर २०२२ मध्ये राज्यात पुन्हा भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पक्षाने आपल्यावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवली. पक्ष संघटनेचा कार्यकर्ता या नात्याने आपण आतापर्यंत पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीला योग्य पद्धतीने न्याय दिलेला आहे.

आता मंत्री या नात्याने लोकांची सेवा करण्यासह पक्षाला मजबूत करून २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यावर आपला भर असेल. दिगंबर कामत आणि आपण दोघेही दक्षिण गोव्यातील आहोत. आम्ही दोघेही खांद्याला खांदा लावून काम करू आणि पक्षाला फायदा मिळवून देऊ, अशी ग्वाहीही तवडकर यांनी दिली. दरम्यान, या कार्यक्रमाला दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी लाभली होती.

तवडकरांकडून सभापतिपदाचा राजीनामा

गेली सुमारे साडेतीन वर्षे विधानसभेच्या सर्वोच्च अशा सभापतीपदावर असलेल्या रमेश तवडकर यांनी गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी सकाळी त्यांनी विधानसभेत जाऊन सचिव नम्रता उल्मन यांच्याकडे सभापतीपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

सभापती या नात्याने विधानसभेचे कामकाज अधिकाधिक पारदर्शक करण्याचा तसेच सर्वच आमदारांना समान न्याय देण्याचा प्रयत्न आपण आपल्या कार्यकाळात केल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, तवडकर यांच्या राजीनाम्यानंतर सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांना लवकरच सभापतीपदाची शपथ दिली जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

लोबो दाम्पत्यासह गावडेंची सोहळ्ळ्याला अनुपस्थिती

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलात कामत, तवडकर यांच्यासह संकल्प आमोणकर आणि मायकल किंवा दिलायला लोबो यांच्यापैकी एक अशा चौघांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, गुरुवारी केवळ कामत आणि तवडकर या दोघांनाच मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमाला बहुतांशी मंत्री आणि आमदार उपस्थित होते. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले पण संधी न मिळालेले संकल्प आमोणकरही उपस्थित राहिले. पण, आमदार लोबो दाम्पत्य, काहीच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळातून वगळलेले गोविंद गावडे व मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: 'जिकडे-तिकडे हायवेवर खड्डे, गणराया मी गावी येऊ कसे...'; मुंबई-गोवा महामार्गाचा व्हिडिओ व्हायरल!

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर! मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना घातली बंदी

मोडकळीस आलेले घर अन् तुटलेले छत, अखेर मिळाला प्रेमाचा निवारा; 80 वर्षीय निराधर आजीच्या मदतीला धावले प्रशासन

हे काय घडलं शेवटच्या चेंडूवर? विजयासाठी 1 रनची गरज असताना ट्वीस्ट, हातची मॅच गमावली; Watch Video

Viral Video: दोन बायका अन् सहा मुलांसह पठ्ठ्याचा बाइक प्रवास, सोशल मीडियावर देसी जुगाड व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT