तृणमूल काँग्रेस पक्षाकडून मलाही ऑफर आलेली आहे. बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) Dainik Gomantak
गोवा

Goa Election: तृणमूल काँग्रेस पक्षाकडून मलाही ऑफर,पण मी शरद पवारांना धोका देणार नाही

काँग्रेस (Congress) पक्षाकडून बाजूला काढण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळे फालेरो (Falero) दुखविले आहे. आता ते स्वतंत्र निर्णय घेऊन तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षातही प्रवेश करू शकतात. आपल्याला तृणमूल काँग्रेसची ऑफर आलेली आहे. बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गोव्यात (Goa) तृणमूल काँग्रेस पक्षाने (Trinamool Congress party) आगमन केले असून दोन महिन्यात तृणमूल काँग्रेसचा आवाज राज्यात दिसून येणार आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून मलाही ऑफर आलेली आहे. परंतु, आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना धोका द्यायचा नाही, अशी मत बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

काँग्रेसचे नेते तथा नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे 1999 साली 21 आमदार निवडून आणले. नंतर, 2017 साली 17 आमदार निवडून आणले. तरीही फालेरो यांना गोव्यातील काँग्रेस पक्षाकडून बाजूला काढण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळे फालेरो दुखविले आहे. आता ते स्वतंत्र निर्णय घेऊन तृणमूल काँग्रेस पक्षातही प्रवेश करू शकतात. आपल्याला तृणमूल काँग्रेसची ऑफर आलेली आहे. पण, आपल्याला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी कधीच दुखविले नसून मी त्यांना धोका देऊ शकत नाही, असे मत चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केले.

गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जुझे फिलिप हे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल याना भेटून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची काँग्रेस पक्षाकडे युतीसंबंधी चर्चा सुरू असून आणखी काही दिवस वाट पाहण्याची सूचना दिलेली आहे. गेल्या निवडणुकीतही काँग्रेस पक्षाकडे युती संबंधी चर्चा करण्यात आली. परंतु, नंतर ही युती झालीच नाही. निवडणूक झाल्यावर अन्य दोन आमदारांना आपल्यासोबत घेऊन आपण लुईझिन फालेरो यांना भेटलो. फालेरो यांनी पाठींब्याचे पत्र तयार करून कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंग यांच्याकडे दिले. पण, हे पत्र सिंग यांनी राज्यपालांना सादर केले नाही आणि याचा फायदा घेऊन भाजप पक्षाने गोव्यात सत्ता स्थापन केली, असा आरोप चर्चिल आलेमाव यांनी केला.

राज्यातील भाजप पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी ही गोमंतकीयांची मागणी असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची काँग्रेस पक्षाकडे युतीसाठी चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षाकडे युती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वतंत्र निवडणूक लढविण्याची हिंम्मत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे निवडणूक लढविण्यासाठी 25 उमेदवार तयार आहेत, असे चर्चिल आलेमाव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol: हरमलमध्ये पोलिसांची धडक कारवाई! 24 तासांत अडकलेल्या 13 मुलींची सुटका; राज्यात खळबळ

Vinod Palienkar: माजी मंत्री विनोद पालयेकरांविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार! म्हापसा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

Land Conversion: 'जमीन रुपांतरणाचे कलम 39A रद्द होणे अशक्य'! मंत्री राणेंचे स्पष्टीकरण; मुख्यमत्र्यांसोबतच्या ‘ट्युनिंग'वर केले भाष्य

Panaji Election: पणजी महापालिकेचा बिगूल! 11 मार्चला मतदान, 13 रोजी मतमोजणी; कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा..

बर्च क्लबमधील भीषण अग्नितांडवाची गंभीर दखल! किनारी ग्रामपंचायतींना व्यवसाय, बांधकाम परवान्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT