Goa Election: Sanjay Raut In goa, Shivsena Will fight 22 seats in Goa assembly  Dainik Gomantak
गोवा

Goa Election: संजय राऊत आज गोव्यात, शिवसेना 22 जागा लढवणार

शिवसेना गोव्यात (Goa Election) 22 जागा लढवणार असल्याचे सांगत संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात (Goa Assembly Election 2022) विविध राष्ट्रीय पक्षांच्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आढावा घेण्यासाठी तसेच शिवसेना (Shivsena) नेते व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे गोवा राज्य संपर्क नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज गोवा दौऱ्यावर येत आहेत. या भेटीदरम्यान ते पक्षाच्या बैठका तसेच पक्षाची तयारी याचा आढावा घेणार आहेत (Goa Election) . (Goa Election: Sanjay Raut In goa, Shivsena Will fight 22 seats in Goa assembly)

यासंदर्भात अधिक माहिती देताना यापूर्वीच गोवा राज्य शिवसेना प्रमुख जीतेश कामत यांनी सांगितले होते की, खासदार राऊत यांच्या भेटीवेळी मांद्रे, पेडणे येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन तसेच कुठ्ठाळ्ळी व पणजीत काहीजण शिवसेनत प्रवेश करणार आहेत. संजय राऊत दुपारनंतर गोव्यात येणारअसतील.

दरम्यान यापूर्वीच बोलताना गोव्यात आम्ही निवडणूक नक्की लढतो आहोत. उत्तर प्रदेश मध्ये देखील 80 ते 90 जागा लढविण्याचा देखील आमचा विचार सुरू आहे. तसेच आम्ही युती करु शकतो याबाबत पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते.त्याच पार्शवभूमीवर त्यांचा आजचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

आता शिवसेना गोव्यात 22 जागा लढवणार असल्याचे सांगत संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT