Goa Election Dainik Gomantak
गोवा

कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युतीच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डची तांत्रिकदृष्ट्या युती झाली आहे. मात्र अजून युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Election: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्‍यासमवेत गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) नेते विजय सरदेसाई व अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांचे हात उंचावून एकत्र आल्याचे संकेत देणारे फोटो सर्वत्र काल व्हायरल झाले. मात्र आज या युतीबाबत (Alliance) विचारले असता, गोवा फॉरवर्ड आणि आमदार प्रसाद गावकर यांनी ‘काँग्रेसला (Congress)आम्‍ही फक्त  पाठींबा  दिलाय’ असे सांगून पुन्हा संभ्रम (Confusion) निर्माण केला आहे. निवडणुकीला (Election) अवघे काही दिवस शिल्लक असताना काँग्रेसने युतीचे घोंगडे अजूनही भिजत ठेवल्याचे  दिसत आहे. यावरून काँग्रेसच्या  निवडणूक तयारीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

दुसरीकडे काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी १० डिसेंबरपर्यंत जाहीर करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘माझा गोवा-माझा जाहीरनामा’च्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. यावेळी जाहीरनामा समितीचे अध्यक्ष रमाकांत खलप, एल्विस गोम्स, राष्ट्रीय सरचिटणीस अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. गुंडूराव म्हणाले, काँग्रेसचा जाहीरनामा बनवण्याचे काम पूर्ण झाले असून तो येत्या काही दिवसांत जाहीर केला जाईल. तत्पूर्वी सर्वसामान्य लोकांची मते जाणून घेऊन त्यांच्या समस्या जाहीरनाम्यातून व्यक्त व्हाव्यात यासाठी नवीन अभियान काँग्रेसतर्फे सुरू करणार आहे. नागरिकांनी त्यांच्या समस्या आणि अपेक्षा 1800 313000033, 9607668897 या नंबरवर नोंद कराव्यात किंवा काँग्रेसकडे पाठवाव्यात, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

लवकरच जागा वाटपाबाबत चर्चा

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डची तांत्रिकदृष्ट्या युती झाली आहे. तर अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मात्र अजून युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. जागावाटपाबाबतची बोलणी येत्या आठवडाभरात होणार असून त्यानंतरच युतीची जाहीर घोषणा होईल. त्याचबरोबर समविचारी पक्षांनी राज्यातील भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी एकत्रित यावे यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.

युतीचे घोंगडे अजूनही भिजत

प्रश्‍नचिन्ह कायम : काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी १० डिसेंबरपर्यंत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT