Election Dainik Gomantak
गोवा

Goa Election: निवडणूक आयोगाची अंतिम मतदार यादी तयार

कोरोनाच्या सावटाखाली आगामी विधानसभा निवडणुका पार पाडण्याचे आवाहन आयोगासमोर असून आयोगाने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: विधानसभा निवडणुका 2022 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी तयार केली असून, मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को मतदारसंघात मिळून 3 हजार 329 मतदार वाढले असून यात 3 हजार 69 नवे मतदार आहेत. 2017 च्या तुलनेत प्रत्येक मतदारसंघात सर्वसाधारणपणे हजार मतदार वाढले, तर मुरगाव मतदारसंघात 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत 743 मतदार कमी झालेत.

कोरोनाच्या सावटाखाली आगामी विधानसभा निवडणुका पार पाडण्याचे आवाहन आयोगासमोर असून आयोगाने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. खबरदारीचे उपाय योजना असताना प्रत्येक मतदान केंद्रावर एक हजार मतदारांची मर्यादा ठेवलेली आहे. त्यामुळे आता 2017 च्या तुलनेने अधिक मतदान केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने जेणेकरून नागरिकांना मतदान करणे सोपे होणार असल्याने ही उपाययोजना आखण्यात आली आहे.

दरम्यान राज्यातील मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, यात मुरगाव तालुक्यातील दाबोळी, वास्को, मोरगावात चारही मतदारसंघात मिळून एकूण 1 लाख 9 हजार 715 मतदार आहेत. जवळ जवळ चार हजार मतदारांची वाढ झाली आहे. या चारही मतदारसंघात मिळून पुरुष मतदारांची जास्त संख्या म्हणजे 55 हजार 63 पुरुष मतदार आहेत. तर 54 हजार 350 महिला मतदार आहेत.

विधानसभा निवडणुकीतील चाळीसही मतदारांपैकी सर्वात जास्त मतदार वास्को मतदार संघात 18 हजार 11 पुरुष व 17 हजार 126 महिला मतदार मिळून 35 हजार 139 मतदार आहेत. या मतदारसंघात 2017 विधानसभा निवडणुकीत मतदार संघात 34 हजार हजार 620 एवढी होती. पैकी 458 मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आले. तर यंदा 855 नवीन मतदारांना समाविष्ट करण्यात आले आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 519 अधिक मतदार या मतदारसंघात वाढले आहेत.

मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघापैकी तसेच राज्यातील 40 ही मतदारसंघांपैकी सर्वात कमी मतदार मुरगाव मतदारसंघात 19 हजार 958 मतदार आहे. यात 1952 पुरुष व 10 हजार 6 महिला मतदारांचा समावेश आहे. 2017 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंघात मतदारसंघात वाढ झाली असून उलट 743 मतदारांची नावे नावे कमी करण्यात आली आहे. 2017 साली 10 हजार 687 पुरुष मतदार होते. पैकी यंदा 735 पुरुषांच्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तर 10 हजार 14 महिला मतदारांपैकी फक्त 7 महिलांची नावे वगळण्यात आली आहे. त्यानुसार 2022 च्या निवडणुकीत 19 हजार 958 मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत. या मतदारसंघात नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली नाहीत.

दाबोळी मतदार संघात 11 हजार 662 पुरुष व 11 हजार 692 महिला मतदार मिळून 23 हजार 354 मतदार आहेत. 2017 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत (21 हजार 144 मतदार संख्या) दाबोळी मतदार संख्येत 2 हजार 210 मतदारांची वाढ झाली आहे. यात 460 पुरुष 512 महिला मतदार मिळून 972 नवीन मतदारांची भरणा आहे. तर 239 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यात 113 पुरुष व 226 महिला मतदारांच्या नावांचा समावेश आहे.

कुठ्ठाळी मतदार संघात 2017 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा 2022 च्या निवडणुकीत 1 हजार 100 मतदारांची अधिक भरणा या मतदारसंघात झाली आहे. 2017 विधानसभा निवडणुकीत मतदार संघात 29 हजार 431 मतदारांचा समावेश होता. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघाची मतदार संख्या 30 हजार 531 एवढी झाली आहे. यात 15 हजार 90 पुरुष व 15 हजार 441 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात 1 हजार 442 नवीन मतदारांना समाविष्ट करण्यात आले आहेत. यात 625 पुरुष व 617 महिला मतदारांचा समावेश आहे. तर 543 मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. वगळण्यात आलेल्या मतदारांत 263 पुरुष व 280 महिलांचा समावेश आहे.

दरम्यान चारही मतदारसंघात मिळून 2017 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक मतदार 2 हजार 210 दाबोळी मतदार संघात वाढले. त्यापाठोपाठ कुठ्ठाळी मतदार संघात 1 हजार 100 मतदारांची वाढ झाली. तर वास्को मतदारसंघात 519 मतदारांची मतदार संख्येत वाढ झाली आहे. तर सर्वाधिक 743 मतदार मुरगांव मतदार संघातून वगळण्यात आले आहे. त्या पाठोपाठ कुठ्ठाळी मतदारसंघातून 543 मतदार तर वास्को मतदार संघातून 458 व दाबोळी मतदार संघातून 239 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT