देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोव्यात (Goa) पाऊल ठेवताच गोव्यातील भाजप (BJP) आमदारांमधील वाद उफाळून आला असल्याची माहिती समोर येत आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa Election: फडणवीसांच्या बैठकी आधी भाजप आमदारांमधील वाद पेटला

मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) मागील अनेक दिवसांपासून आपल्याच सरकार विरोधात बोलत असल्याने, त्याचा फटका पक्षाला बसत आहे. याबाबत अनेक आमदारांनी (MLA) तक्रार केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोव्यात (Goa) पाऊल ठेवताच गोव्यातील भाजप (BJP) आमदारांमधील वाद उफाळून आला असल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी गोवा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील भाजप आमदार आणि मंत्री यांची बैठक बोलाविली होती. परंतु या बैठकीपूर्वी मंत्री मायकल लोबो (Michael Lobo), दीपक प्रभू पाऊस्कर (Deepak Prabhu Pauskar), गोविंद गावडे (Govind Gawde) आणि आमदार बाबूश मॉन्सेरात (Babush Monserrat) यांच्यात वादावाद झाल्याची घटना घडली असल्याचे समोर आले आहे.

मंत्री मायकल लोबो यांनी मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांच्याकडून आपली कामे होत नाहीत. असा अरोप करताचा पाऊस्कर आणि लोबो यांच्यात वाद पेटला. त्यामुळे मायकल लोबो हे बैठकीतून निघून जाण्यास निघाले. परंतू उपस्थित आमदारांनी त्यांना अडवून थांबविले. तसेच मंत्री गावडे यांच्याकडूनही कामे मार्गी लावली जात नसल्याचा आरोप पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी केला वाद पुन्हा उकरुन काढला. त्यांना आमदारांनी शांत केले.

याबाबत पत्रकारांनी मंत्री लोबो यांना याबाबत विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. तर लोबो आणि आपल्यात कोणताही वाद झाला नसल्याचा दावा मंत्री पाऊस्कर यांनी केला आहे. तर मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी याबद्द्ल बोलताना सांगितले की, जर वाद झालेलेच असतील तर त्याचा शोध तुम्हीच घ्या. तसेच मंत्री गावडे म्हणाले, अशी काही भांडणे झाली आहेत का या संदर्भात मला काहीच माहिती नाही. पण एक-दोन आमदारांनी असे वाद झाल्याचे सांगितले पण त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आमदार एकत्र आल्यावर थोड्या फार कुरबुरी होत राहतात. असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्री मायकल लोबो मागील अनेक दिवसांपासून आपल्याच सरकार विरोधात बोलत असल्याने, त्याचा फटका पक्षाला बसत आहे. याबाबत अनेक आमदारांनी तक्रार केली आहे तरी देखील पक्षाकडून त्यांच्याविरोधात नरमाईचे धोरण आवलंबिले जात आहे. त्यामुळे आमदारांमध्ये नाराजीचा सूर वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Firecracker Factory Blast: आंध्र प्रदेशात काळाचा घाला! फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 18 कामगारांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

"त्यानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, म्हणून मी त्याला गोळ्या घातल्या'' मुलाच्या डोळ्यादेखत बापाची हत्या; आरोपीनं व्हिडिओ बनवून दिली गुन्ह्याची कबुली

Explainer: इस्रायल अन् अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला! युद्धाचा भडका का उडाला? जाणून घ्या वादाचं 'मेन' कारण VIDEO

Israel US Attack on Iran: मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा पेटला! भारतीय नागरिकांसाठी 'ट्रॅव्हल ॲडव्हायजरी' जारी; सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

"आई-बाबा मला माफ करा, तुमचे स्वप्न मी पूर्ण करु शकले नाही" पोलीस भरतीतील अपयशाच्या धक्क्यातून 26 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT