केंद्रात काँग्रेस (Congress) आणि तृणमूल (Trinamool) यांचे संबंध ताणले गेले असून त्याचा परिणाम गोव्यावरही होण्याची शक्यता आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa Election: काँग्रेस-तृणमूलमध्ये वादाची ठिणगी, युतीची शक्यता धूसर

तृणमूल (Trinamool) हा पक्ष फक्त काँग्रेसच्या (Congress) मतांची विभागणी करून त्याचा फायदा भाजपला व्हावा या एकमेव उद्देशाने गोव्यात उतरला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: लखीमपूर (Lakhimpur) शेतकरी हत्त्याकांड मुद्यावर देशात सर्व विरोधी पक्ष एकत्र आणण्यासाठी काँग्रेसने (Congress) प्रयत्न चालविले असतानाच केंद्रात काँग्रेस आणि तृणमूल (Trinamool) यांचे संबंध ताणले गेले असून त्याचा परिणाम गोव्यावरही होण्याची शक्यता आहे. या नव्या राजकीय घडामोडीनंतर गोव्यात (Goa) समविचारी पक्ष एकत्र येऊन भाजप (BJP) विरोधात युती करून निवडणूक लढविण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. लखीमपूर मुद्यावरून काँग्रेस आणि तृणमूलच्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये ट्विट युद्ध पेटले आहे.

सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न चालू असतानाच तृणमूलचे रणनितीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनी लखीमपूर मुद्यावरून सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न चालू केला असला, तरी या विविध पक्षांत जी दरी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यास आणखी बरेच काही करावे लागणार आहे, असे सूचक ट्विट केले आहे. त्यामुळे तृणमूल आणि काँग्रेसचे जुळणार नाही हे स्पष्ट होत आहे.

सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न :लुईझिन फालेरो

‘प्रशांत किशोर यांनी काय ट्विट केले आणि का केले आहे त्याची मला कल्पना नाही, मी त्याच्यावर बोलू शकत नाही. मात्र, मी जेव्हा प्रशांत किशोर यांना भेटलो होतो त्यावेळी त्यांनी मला तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, वायएसआर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्यासाठी आपले प्रयत्न सांगितले होते.

सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे : विजय सरदेसाई

आमचा प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे केंद्रात कोणते मुद्दे चालू आहेत याचे आम्हाला काही देणे -घेणे लागत नाही. गोव्यातील भाजप सरकार उलथविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे ही सध्याची गरज आहे. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेण्याची गरज आहे.

युतीला पाशेकोंचा विरोध

‘उद्या बाणावलीत गट कार्यकर्त्यांबरोबर केंद्रीय नेते पी. चिदंबरम यांच्या बरोबर होणाऱ्या बैठकीत आम्ही गोव्यात काँग्रेसला कुठल्याही युतीची गरज नाही, हा संदेश ठळकपणे देणार आहोत, असे पाशेको म्हणाले. तृणमूल हा पक्ष फक्त काँग्रेसच्या मतांची विभागणी करून त्याचा फायदा भाजपला व्हावा या एकमेव उद्देशाने गोव्यात उतरला आहे. अन्यथा त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फोडण्याऐवजी भाजप नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न केला असता, असेही पाशेको म्हणाले.

फालेराेंबाबत...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त केलेले लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस पक्षाशी प्रतारणा करून तृणमूल पक्षाला जवळ केले त्याचे पडसाद आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत उमटले. आता आणखी कोण बंडखोरी करू पाहत असल्यास त्याचा शोध घ्यावा आणि त्यांना गट समितीतून बाहेर काढावे, अशी सूचना त्यांनी दिली. फालेरो यांचे काँग्रेस सोडून जाणे पक्षासाठी निश्चितच हानिकारक आहे. त्यामुळे काँग्रेसची मते तृणमूल पक्षात वळण्याची शक्यता आहे. मात्र भाजपला हरविण्यासाठी गोव्यात काँग्रेस हाच सक्षम पक्ष हे आता काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी पटवून दिले पाहिजे, असे चिदंबरम यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT