Goa Election BJP's Mission Election begins after Corona control 
गोवा

Goa Election : कोरोना नियंत्रणानंतर आता भाजपची ‘मिशन इलेक्शन’ ला सुरुवात

दैनिक गोमंतक

पणजी : कोरोना (Covid 19) नियंत्रणानंतर आता भाजपने (BJP) गोव्यात (Goa) ‘मिशन इलेक्शन’ (Mission Election) म्हणजेच विधानसभा निवडणुका २०२२ वर लक्ष केंद्रीत करत गटबांधणी आणि रणनितीला सुरुवात केली आहे. यासाठी भाजपने १५ दिवसांचा एक कार्यक्रम देखील आखला आहे. २१ जून ते ६ जुलै पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. यामध्ये योग दिन, (Yoga Day) वृक्षारोपण, श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करणे आणि मन की बात आदी. गोष्टींचा यात समावेश करण्यात आला आहे. (Goa Election BJP's Mission Election begins after Corona control)

याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तनावडे म्हणाले, भाजप कर्यकर्ते आम्हाला मैदानात हवे आहेत. हाच विचार करुन आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आम्हाला १९१ ग्रामपंचायती आणि १४ नगरपालिकेतील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचे आहे. युती बाबत आताच कोणत्याही राजकीय पक्षाशी चर्चा करणे योग्य ठरणार नाही. येणारी विधानसभा आम्हाला स्वबळावर जिंकायच्या आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप हा पहिला पक्ष आहे की ज्याने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. परंतु अंतिम निकाल हा शेवटी होणाऱ्या राजकीय रणनितीवरच अवलंबून असतो. मतदारांशी संपर्क साधण्याचा एक भाग म्हणून डॉ. शेखर साळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक वैद्यकीय पथक तयार करण्यात आले आहे. यात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. जेणे करुन कोरोनाची तिसरी लाट आल्यास या कार्यकर्त्यांना लोकांची मदत करता येणे सोपे होईल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2027: 18 कोटींच्या मेगा ट्रेडनंतर मोठा सस्पेन्स; पंजाब किंग्सचा नवा 'कॅप्टन' कोण, श्रेयस अय्यर की हार्दिक पांड्या?

Goa T20 Squad: अभिनव तेजराणाकडे टी-20 संघाचे नेतृत्व, अर्जुन तेंडुलकर अजूनही अनफिट; स्नेहल कवठणकरला विश्रांती

Stray Dogs: पेडणे न्यायालय परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; ज्येष्ठ नागरिकाचा घेतला चावा, न्यायालयात येणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

चिमुरडीला कोणीतरी खेचत घेऊन चालला, तेव्हा आपलीच मंडळी त्याला हटकत नव्हती..! म्हापशातील दुर्घटनेने उघडे पाडले समाजाचे सुन्न वास्तव

गोव्यातही सरपंचांची थेट निवड व्हावी!

SCROLL FOR NEXT