Goa Election: 'Apana Bharat' party now in Goa for assembly election Dainik Gomantak
गोवा

Goa Election:‘अपना भारत’ हा पक्षही गोव्यात,लढवणार विधानसभा निवडणूक

राज्‍यातील निवडणुका (Goa Election) जवळ येऊ लागल्या तसे विविध पक्ष राज्यात बस्तान बसविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्‍यातील निवडणुका (Goa Election) जवळ येऊ लागल्या तसे विविध पक्ष राज्यात बस्तान बसविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अलीकडेच तृणमूल कॉंग्रेसच्या (TMC) नेत्यांनी राज्यात उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती. त्‍यानंतर आता ‘अपना भारत’ (Apana Bharat)या पक्षाने राज्यात निवडणूक लढविण्यासाठी (Goa Assembly Election)प्रयत्न चालविले आहेत. (Goa Election: 'Apana Bharat' party now in Goa for assembly election)

विशेष म्हणजे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे माजी खासदार आणि आताचे ‘अपना भारत’ पक्षाचे प्रमुख अशोक तंवर हे गोव्यात दाखल झाले आहेत. त्‍यांनी गुरुवारी (ता. २४) रात्री केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्याशी चर्चाही केली. तसेच मिनेझीस ब्रागांझा सभागृहात त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमदेखील पार पडला. त्यामुळे भाजपचे या पक्षाशी कनेक्शन तर नाही ना असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीवर आता साऱ्यांच्याच नजरा खिळून आहेत. कधी नव्हे त्या पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस या प्रादेशिक पक्षानेही गोव्याच्या राजकारणात उडी घेतली आहे. त्या पाठोपाठ आता ‘अपना भारत’ही त्या दिशेने वाटचाल करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT