'सरकार तुमच्या दारी' उपक्रमाला डिचोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ !

रविवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांच्या हस्ते या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
Dr. Pramod Sawant launch 'Government at your door' Scheme
Dr. Pramod Sawant launch 'Government at your door' SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत आणि मोठ्या उत्साहात डिचोलीत 'सरकार तुमच्या दारी' या कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. रविवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांच्या हस्ते या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी डिचोलीचे (Bicholim) आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर, मयेचे आमदार प्रवीण झांट्ये, महसूल खात्याचे सचिव संजीवकुमार श्रीवास्तव, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय आणि नगराध्यक्ष कुंदन फळारी उपस्थित होते. (Dr. Pramod Sawant launch 'Government at your door' program)

डिचोलीसह मये मतदारसंघातील जनतेसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी दोन्ही मतदारसंघातील नागरिकांनी गर्दी केली आहे.

Dr. Pramod Sawant launch 'Government at your door' Scheme
GAF चा पहिला सामना एकऑक्टोबर रोजी

डिचोलीतील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात या कार्यक्रमाला सुरवात झाली आहे. 'सरकार तुमच्या दारी' उपक्रमांतर्गत सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी डिचोलीत उपस्थित आहेत. या कार्यक्रमातून जनतेला सरकारी योजनांच्या माहितीसह त्याचबरोबर प्रशासकीय अडीअडचणीही अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याव्यतिरिक्त आरोग्य विषयक तपासणीही करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणाचा दुसरा डोस देण्याचीही व्यवस्था उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Congress E20 Petrol
Goa Human Rights Commission Gratuity Refund
Ajay Kholkar video Morphing Allegation
Chimbel Unity Mall Protest
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com