गोवा प्रभारी दिनेश राव यांनी पणजीचे माजी महापौर व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुरेंद्र फुर्तादो यांची भेट घेतली Dainik Gomantak
गोवा

'इतर कुणी नेते फुटू नयेत' यासाठी काँग्रेसच्या हालचाली

इतर कुणी नेते फालेरो सोबत जाऊ नयेत यासाठी कॉंग्रेसचे जोरदार प्रयत्न

Dainik Gomantak

Goa Election 2022: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले लुईझीन फालोरो (Congress Leader Luizinho Faleiro) यांनी आमदारकी सोडतानाच पक्षालाही रामराम केल्यानंतर गोव्यातील इतर कुणी नेते फालेरो सोबत जाऊ नयेत यासाठी कॉंग्रेसने (Congress) केंद्रिय स्तरावर व राज्यस्तरावरही जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कळंगुटचे माजी आमदार व प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस आग्नेल फर्नाडिस यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलावले असून दिल्लीला पोचलेले फर्नाडिस हे राहूल गांधी भेट घेणार असल्याचे कळते. दुसरीकडे राज्यातील लुईझीन फालेरो समर्थक कॉंग्रेस नेते फुटू नयेत यासाठी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव प्रयत्न करत आहेत. नाराज नेत्यांना समजावण्यसाठी ते त्यांच्या घरी जात आहेत.

राव यांनी घेतली सुरेंद्र फुर्तादोंची भेट

लुईझीन फालेरो यांनी काल कॉंग्रेसचा त्याग केल्यामुळे सावध झालेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी कॉंग्रेसचे अन्य नेते फूटू नयेत यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. याच हालचालीचा एक भाग म्हणून आज गोवा प्रभारी दिनेश राव यांनी पणजीचे माजी महापौर व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुरेंद्र फुर्तादो (Congress Leader Surendra Furtado) यांची भेट त्यांच्या दोनापावला येथील निवासस्थानी जाऊन घेतली. व पक्षासोबत कायम राहण्याची विनंती केली. फुर्तादो हे लुईझीन फालेरो समर्थक म्हणून परिचीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT