Loan Dainik Gomantak
गोवा

Goa Education Loan: गोव्यात 481 कोटींची शैक्षणिक कर्ज थकीत, 5108 खाती NPA मध्‍ये; केंद्र सरकारचा अहवाल

Goa education loan NPA: शिक्षणासाठी घेतलेल्‍या कर्जाची तब्‍बल ५१०८ खाती सद्य:स्‍थितीत एनपीए असून, विविध बँकांमध्‍ये ४८१ कोटींचे कर्ज थकीत असल्‍याचे केंद्र सरकारने जारी केलेल्‍या एका अहवालातून समोर आले आहे.

Sameer Panditrao

पणजी: शिक्षणासाठी घेतलेल्‍या कर्जाची तब्‍बल ५१०८ खाती सद्य:स्‍थितीत नॉन-परफॉर्मिंग अ‍ॅसेटमध्‍ये (एनपीए) असून, विविध बँकांमध्‍ये ४८१ कोटींचे कर्ज थकीत असल्‍याचे केंद्र सरकारने जारी केलेल्‍या एका अहवालातून समोर आले आहे. गेल्‍या दहा वर्षांत गोव्‍यात ‘एनपीए’मध्‍ये गेलेली शैक्षणिक कर्जांची खाती आणि थकीत रकमेचा सविस्‍तर आढावा या अहवालातून देण्‍यात आला आहे.

मार्च २०१६ मध्‍ये अशा प्रकारची ३२४६ खाती ‘एनपीए’मध्‍ये होती आणि थकीत रक्कम ११३ कोटी इतकी होती. परंतु दहा वर्षांत ‘एनपीए’ खाती आणि त्‍यातील थकीत रकमेतही वाढ होत गेल्‍याचे अहवालातून दिसून येते.

गोव्‍यासह देशभरात शैक्षणिक कर्जांची खाती मोठ्या प्रमाणात ‘एनपीए’मध्‍ये जात असल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर कर्जे वसूल करण्‍यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्‍वे लागू केलेली होती.

त्‍यात अशा कर्जांच्‍या वसुलीसाठी एजंट्सची नियुक्ती करताना योग्य तपासणी प्रक्रिया राबवावी, बँकांनी कर्जदाराला वसुली एजन्सी फर्म्स किंवा कंपन्यांची माहिती द्यावी, वसुली एजन्सीकडे डिफॉल्ट प्रकरणे पाठवताना वसुली एजंट्सने ग्राहकांना केलेले कॉल्‍स रेकॉर्ड केले आहेत का,

याची बँकांनी खात्री करावी, नियुक्त केलेल्या वसुली एजन्सी फर्म्स किंवा कंपन्यांची अद्ययावत माहिती बँकेच्या वेबसाईटवर पोस्ट करावी, कर्ज वसूल करण्याच्या प्रयत्नात कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कोणत्याही प्रकारची धमकी किंवा छळवणूक होणार नाही, याची बँकांनी कडकपणे काळजी घ्‍यावी,

एजंटकडून मोबाईलवर किंवा सोशल मीडियाद्वारे अनुचित संदेश पाठवणे, धमकी देणे, निनावी कॉल करणे, कर्जदाराला सतत कॉल करणे किंवा कर्जदाराला सकाळी ८ पूर्वी आणि संध्याकाळी ७ नंतर कॉल करणे कायदेशीररीत्‍या चुकीचे असून त्‍याकडे बँकांनी लक्ष द्यावे, असे म्‍हटले होते.

वर्ष खाती रक्कम

२०१६ ३,२४६ ११३

२०१७ ३,४२७ १२९

२०१८ ४,३९३ १६५

२०१९ ४,७०८ १८३

२०२० ४,६४५ २१९

२०२१ ४,२८५ २३९

२०२२ ४,१५१ २७६

२०२३ ४,३७२ ३३९

२०२४ ४,९८५ ४०७

२०२५ ५,१०८ ४८१

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Most Powerful Year: 2026 शतकातील सर्वात 'शक्तीशाली वर्ष'; सर्वांना होणार मोठा फायदा, ज्योतिषांनी दिले महत्वाचे संकेत, वाचा सविस्तर

Goa tourism: कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान गोव्यात दाखल, दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांचं केक कापून स्वागत

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

SCROLL FOR NEXT