Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: नव्या शैक्षणिक वर्षासाठी 2 दोन कायद्यांमध्‍ये होणार बदल, सरकार लवकरच वटहुकूम जारी करणार

Goa Education News: एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्‍यासाठी दोन कायद्यांमध्‍ये बदल करावा लागणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्‍यासाठी दोन कायद्यांमध्‍ये बदल करावा लागणार आहे. त्‍या अनुषंगाने कायदा दुरुस्तीचे वटहुकूम जारी करण्याची तयारी सरकारने केली आहे. या वटहुकूमांचा मसुदा तयार करण्‍यात येत असून, येत्‍या आठवड्यात ते जारी केले जातील, अशी माहिती शिक्षण खात्‍याच्‍या सूत्रांनी दिली.

शालेय शिक्षण कायदा व शिक्षण हक्क कायदा अशा दोन कायद्यात आवश्यक ते बदल केले जाणार आहे. शिक्षण खात्‍याने केलेल्‍या नियोजनानुसार ७ एप्रिलपासून सकाळी ८ ते ११.३० यावेळेत सहावी ते दहावी व बारावीचे वर्ग भरतील.

त्‍यासाठी दोन कायद्यांमध्‍ये बदल करावे लागणार आहेत. शिक्षण कायदा १९८४ साली तयार झाला; तर शैक्षणिक नियम १९८६ला अमलात आले. त्‍यानुसार एप्रिलपासून परीक्षा सुरू होतात, त्‍या आठ दिवस चालतात. पुढे आठ ते दहा दिवस पेपर तपासले जातात. नंतर सहा आठवड्यांची उन्‍हाळी सुटी जाहीर होते.

५ जूनच्‍या सुमारास शाळा सुरू होतात. परंतु, यंदापासून हे शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू होऊ घातल्‍याने कायदे बदल अपरिहार्य बनले

आहे.२००९मधील शिक्षण हक्‍क कायद्यानुसार, अधिकारी भरणा अधिक असलेल्‍या जागी अधिकाधिक शिक्षण तज्‍ज्ञ नेमण्‍यात येतील, अशी माहितीही प्राप्‍त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT