Government schools Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Education: "सरकारी शाळा टिकवायच्या तर इंग्रजी माध्यम हवेच!!" लोबो यांचे मोठे विधान

Michael Lobo: भाऊसाहेब बांदोडकरांनी सुरू केलेल्या शाळा टिकवायच्या असतील, तर प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून सुरू करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. भाऊसाहेब बांदोडकरांनी सुरू केलेल्या शाळा टिकवायच्या असतील, तर प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून सुरू करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या गोव्यातील शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. अशा परिस्थितीत आमदार मायकल लोबो यांचे विधान महत्त्वाचे ठरले आहे.

"शाळा इंग्रजी माध्यमातून करा"

आमदार मायकल लोबो यांच्या मते, भाऊसाहेब बांदोडकरांनी सुरू केलेल्या शाळा टिकवण्यासाठी त्या इंग्रजी माध्यमातून सुरू करणे गरजेचे आहे. प्राथमिक शाळा टिकवायच्या असतील, तर यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये कोकणी आणि मराठी भाषा अनिवार्य करणेही महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

गोव्यातील अनेक शाळा सध्या इंग्रजी माध्यमातून सुरू आहेत आणि या शाळा चांगली कामगिरी करत असल्याने पालकांचा कल प्राथमिक शाळांकडे आहे. राज्यातील सरकारी प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याने सरकार या शाळा स्वयंसेवी संस्थांना देण्याचा विचार करत आहे.

गोव्यातील सरकारी प्राथमिक शाळा सुरू राहाव्यात यासाठी सरकार वेळोवेळी त्यांची दुरुस्ती करते, शिक्षकांचे पगारही वाढवते, तरीही या शाळा बंद होत आहेत. भाषेचा वाद शिक्षणामध्ये येऊ नये, असे सांगत आमदार लोबो यांनी गोव्यातील प्राथमिक शाळा इंग्रजी माध्यमातून असाव्यात, असे मत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT