Boy Students Dropout Rate Goa
पणजी: भारतात शिक्षणाच्या बाबतीत गोव्याने नेहमीच उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. बाकी राज्यांच्या तुलनेत शाळा सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा गोव्यात बराच कमी आहे.
अनेक ठिकाणी सरकारने शैक्षणिक उपक्रम राबवले असताना देखील शाळा सोडून जाण्यात मुलींचा आकडा मुलांपेक्षा कायम अधिक राहिला आहे, मात्र सध्या गोव्यात वेळीच परिस्थिती निर्माण होताना दिसतेय. मुलींच्या तुलनेत मुलं इयत्ता ९ ते १० वीच्या वर्गात असताना शाळा अर्ध्यावर सोडण्याची शक्यता दुप्पट झाली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन (U-DISE) च्या वर्ष २०२२-२३ च्या अहवालातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गोव्यात माध्यमिक स्तरावर एकूण विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण ८.८ टक्के आहे, ज्यामध्ये १०.९ टक्के आकडा हा मुलांचा असून ६.४ टक्के मुलींनी शालेय शिक्षण सोडले आहे. याउलट, प्राथमिक स्तरावर शाळा सोडण्याचे प्रमाण केवळ ०.३ टक्के होते आणि यामध्ये एकाही मुलाने शाळा सोडली नाही.
गोव्यातील ग्रॉस एनरोलमेंट रेशो माध्यमिक वर्ग वगळता सर्व वर्गांमध्ये १०० टक्क्यांच्या वर राहिला. गोव्यात उच्च प्राथमिक स्तरावर ग्रॉस एनरोलमेंट रेशो ११३.४ टक्के आणि प्राथमिक स्तरावर ११९.७ टक्के असा आहे.
अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की मुलं आणि मुली दोघांमध्येही ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा १०० टक्क्यांहून अधिक राहिला आहे, पण नोंदणीच्या बाबतीत मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे याचा अर्थ असा होतो की गोव्यात अधिक प्रमाणात मुली शिक्षण घेतायत.
एका वयोगटात साधारणपणे किती विद्यार्थी आहेत या आकड्याच्या तुलनेत शाळेत किती विद्यार्थी रुजू झाले आहेत हे मोजण्याचा हा एक मार्ग आहे. १०० टक्के ग्रॉस एनरोलमेंट रेशोचा अर्थ असा आहे की संबंधित वयोगटातील सर्व विद्यार्थी शाळेत जात आहेत, तर १०० टक्क्यांपेक्षा जास्त ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे संबंधित वयोगटातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी शाळेत नोंदणी करत आहेत. यात बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असू शकतो किंवा मागे राहिलेले विद्यार्थी देखील असू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.