Goa School Academic Year Dainik Gomantak
गोवा

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

Goa Education Directorate Schedule: शिक्षण संचालनालयाने आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीचे वेळापत्रक आणि सुट्ट्यांचे नियोजन अधिकृतपणे जाहीर केले.

Manish Jadhav

पणजी: शिक्षण संचालनालयाने आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीचे वेळापत्रक आणि सुट्ट्यांचे नियोजन अधिकृतपणे जाहीर केले. या नवीन आदेशानुसार, राज्यातील शालेय शिक्षणाच्या रचनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून एप्रिल महिन्यापासूनच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी संचालनालयाने हे पाऊल उचलले आहे.

नवीन नियमांनुसार, इयत्ता 5 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 13 मार्च ते 30 मार्च 2026 या कालावधीत सत्र विश्रांती (Term Break) असेल. या विद्यार्थ्यांचा निकाल 31 मार्च 2026 पर्यंत घोषित करणे शाळांना अनिवार्य करण्यात आले. विशेष म्हणजे, इयत्ता 6 वी ते 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष 1 एप्रिल 2026 पासून सुरु होणार आहे. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता एप्रिल महिन्यात भरणाऱ्या या वर्गांचा कालावधी दररोज किमान साडेतीन तासांचा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरुन विद्यार्थ्यांना (Student) दुपारच्या कडक उन्हाचा त्रास होणार नाही.

प्राथमिक शिक्षणाबाबत (इयत्ता 1 ली ते 4 थी) बोलताना संचालनालयाने स्पष्ट केले की, या वर्गांचे अध्यापन 27 मार्चपर्यंत नियमितपणे सुरु राहील. त्यानंतर, 30 मार्च ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत या लहान मुलांच्या परीक्षा घेतल्या जातील. प्राथमिक वर्गांचा निकाल उशिराने म्हणजेच 30 एप्रिल 2026 रोजी जाहीर केला जाणार आहे. तसेच, इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्यांचा निकालही 31 मार्चपर्यंत लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षण संचालनालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना आपल्या उन्हाळी सुट्ट्यांचे आणि पुढील वर्षाच्या तयारीचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. एप्रिलमध्ये शाळा सुरु होणार असल्या तरी साडेतीन तासांच्या मर्यादित वेळेमुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे नवीन वेळापत्रक राज्यातील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना लागू असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Narvekar Marathi Controversy: शोक-पस्तावावर खुलासा..!

Football Stars Legs Insurance: मेस्सी-रोनाल्डोच्या पायांची किंमत बड्या कंपन्यांपेक्षाही जास्त, फुटबॉल स्टार्स विमा का काढतात? जाणून घ्या

Pandharpur: दर्शन, चंद्रभागेपासून विठ्ठल चरणांपर्यंत!

Goa Sessions Court: कनिष्ठ न्यायालयाचा 'तो' निर्णय तर्कहीन; कारावासाची शिक्षा केली रद्द, रवींद्रनाथ गावकर दोषमुक्त

Goa IIT Campus: मेळावलीतील जमीन पुन्हा ताब्यात घेणार; 'आयआयटी गोवा' स्थलांतर प्रकल्पावर सरकारकडून पडदा

SCROLL FOR NEXT