Goa SSC Exam 2025 Result Dainik Gomantak
गोवा

Goa SSC Result: दहावीच्या निकालात सरकारी, ग्रामीण शाळांची भरारी! सत्तरी, डिचोलीतील विद्यार्थी चमकले

Goa 10th Result 2025: राज्यातील ४०७ शाळांपैकी १७३ विद्यालयांचा निकाल हा शंभर टक्के लागला असून उल्लेखनीय म्हणजे या निकालात सरकारी शाळांची कामगिरी ही इतर शाळांचा तुलनेत अधिक चांगली आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा शालान्त मंडळाने सोमवारी (ता.७) दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. एकूण निकाल ९५.३५ टक्के लागला जो वाखाणण्याजोगा आहे. राज्यातील ४०७ शाळांपैकी १७३ विद्यालयांचा निकाल हा शंभर टक्के लागला असून उल्लेखनीय म्हणजे या निकालात सरकारी शाळांची कामगिरी ही इतर शाळांचा तुलनेत अधिक चांगली आहे.

तसेच या निकालाचे अवलोकन केल्यास ही बाबदेखील लक्षात येते की शहरी भागापेक्षा राज्यातील ग्रामीण भागातील शाळांची कामगिरी अधिक चांगली असून निकालही चांगला लागलेला आहे.

सत्तरी तालुक्यातील ११ सरकारी शाळा आणि तीन अनुदानीत शाळांचा निकाल हा १०० टक्के तर डिचोली तालुक्यात ७ सरकारी शाळा आणि १० अनुदानीत शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुकावार आकडेवारीत सर्वाधिक ९८.५० टक्के इतका निकाल डिचोली तालुक्याचा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातील दहावीचा निकाल अतिशय उत्तम लागलेला आहे. प्रत्येक तालुक्यांच्या उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांमध्ये देखील वाढ झालेली आहेत. या निकाल वाढीची अनेक कारणे आहेत. प्रत्येक शाळेतर्फे आपला निकाल चांगला लागावा यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना अतिरिक्त शिकवण्या आदी उपाय केले जातात. या सर्व कारणांमुळे यंदा निकाल उत्तम लागला असल्याचे गोवा बोर्डाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना क्रीडागुणांचा लाभ

यंदा दहावीच्या परीक्षेत आयटीआयचे १२ उमेदवार बसले होते त्‍यातील एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही.

५७६ विद्यार्थी परीक्षेत सात विषय घेतल्याच्या लाभातून उत्तीर्ण झाले.

२१४ विद्यार्थी क्रीडागुणांचा लाभ घेत उत्तीर्ण झाले.

दिव्यांग विद्यार्थ्यांची कामगिरी अतिशय उत्तम असून ४७७ पैकी ४५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दिव्यांग उत्तीर्ण टक्का ९४.३४ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा, जीएमसीत उपचार सुरु; मये-डिचोलीतील घटना

Viral Video: 'पप्पा पोलीसमध्ये आहेत, गोळी घालेन...', होमवर्क दिल्यावर चिमुकल्याची थेट शिक्षिकेला धमकी; 'लिटिल डॉन'चा व्हिडिओ व्हायरल!

New Mahindra SUV: टोयोटाची झोप उडवणार महिंद्राची नवी पिकअप! स्कॉर्पिओ आणि थारचं जबरदस्त कॉम्बिनेशन

गोव्याच्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल; तेलाच्या नावाखाली सुरु होती तस्करी, वैभववाडीत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये जो रुट गाठणार नवा 'माइलस्टोन'! 22 धावा करताच रचणार इतिहास

SCROLL FOR NEXT