Petrol Price Hike Dainik Gomantak
गोवा

Petrol Price Hike : आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या!

बहुतांश बसगाड्या बंद : इंधन दरवाढ तसेच इतर कारणे; प्रवाशांचे होताहेत हाल

गोमन्तक डिजिटल टीम

पाळी : कोरोनानंतर राज्यातील ग्रामीण भागातील प्रवासी बसगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून इंधनाचे आणि सुट्या भागांचे वाढते दर, विम्यासाठी मोजावी लागणारी मोठी रक्कम तसेच सरकारच्या विविध परवान्यांचे वाढीव दर यामुळे विशेषतः खासगी प्रवासी बसगाड्या अजूनही बऱ्याच ठिकाणी बंदच आहेत.

डिचोली तालुक्यातील डिगणे, सुर्ला, वेळगे, पाळी व उसगाव भागातील प्रवाशांची बसगाड्यांअभावी कुचंबणा होत असून सरकारने याप्रकरणी त्वरित लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

फोंडा ते साखळी, डिचोली व फोंडा ते वाळपई आणि फोंडा ते मोले आदी ठिकाणच्या बसगाड्या आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या असा प्रकार असल्याने अधूनमधून बंदच असतात. प्रवासी मिळत नसल्याने बहुतांश बसगाड्या पूर्ण फेऱ्या मारत नाहीत, त्यामुळे सकाळी दहानंतर आणि संध्याकाळी चारपर्यंतच्या काळात प्रवाशांना योग्य प्रवासी बससेवा मिळत नसल्याने बसथांब्यांवर तासन्‌तास ताटकळत राहावे लागते.

या सर्व मार्गांवर खासगी बसगाड्यांची संख्या जास्त आहे. मात्र, चालतात अर्ध्याहून कमी असा प्रकार आहे. कदंब महामंडळाच्या बसगाड्या या मार्गावर आहेत; पण त्या तुटपुंज्या आहेत. या मार्गावर प्रवाशांची पुरेशी संख्या नसल्याचे तसेच नादुरुस्त बसगाड्यांचे कारण दाखवून कदंबच्या बसगाड्या बंदच करण्यात आल्या.

फक्त सकाळी आणि संध्याकाळी अशा काही कदंब बसगाड्या सध्या सुरू आहेत. सरकारने या मार्गांवर योग्य बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

कोरोनानंतर आली मंदी

प्रवासी बसगाड्यांना खरे म्हणजे कोरोनानंतर मंदीचा काळ आला. गेल्या 2020 मध्ये कोरोना महामारीवेळी प्रवाशांची संख्या रोडावली. कामाधंद्यावर जाणारे लोक दुचाकी आणि चारचाकीचा वापर करू लागले. फक्त रोजंदारीवर जाणारे कामगार आणि मजूर तेवढे बसगाड्यांचे प्रवासी ठरले. तसेच योग्य कामधंदा नसल्याने हे प्रवासीही घटले.

इंधन आणि इतर दर वाढल्यामुळे प्रवासी बस चालवणे परवडत नाही. खरे म्हणजे सरकारने इंधनाच्या दरात अनुदान दिले पाहिजे आणि त्यात सातत्य असले पाहिजे.

- प्रकाश नाईक, बसमालक

पूर्वीप्रमाणे बसगाड्यांना प्रवासी मिळत नाहीत. कोरोनानंतर लोकांनी दुचाकींवर जाणे पसंत केले आहे. त्यातच प्रत्येकाकडे दुचाकी असल्याने किरकोळ प्रवासीच बसगाड्यांना मिळतात.

- रामदास गावकर, चालक

सध्या खासगी प्रवासी बसगाड्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही. खर्च जास्त तर आमदनी कमी असा प्रकार झाला असून बसगाडी बंद ठेवणेही आणखी खर्चाचे झाले आहे.

- सुरेश नाईक, वाहक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

विकेट पडताच टीव्ही बंद करायचे, 'या' महान भारतीय क्रिकेटपटूला मुलगा मानायचे, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 'ती' खास पोस्ट चर्चेत!

SCROLL FOR NEXT