Goa E Challan Wrongly Issued Dainik Gomantak
गोवा

Goa E Challan Wrongly Issued: दुचाकीचा नियमभंग, दंड फक्त चारचाकी धारकाला! चुकीच्या ई-चलनामुळे वाहनमालकाची धावपळ

E Challan Human Error: संबंधित वाहनधारकाने आपल्या अनुभवाची माहिती समाजमाध्यमावर शेअर केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ई-चलन प्रणाली प्रभावी ठरत असली, तरी प्रणालीतील मानवी चुका वाहनधारकांसाठी मनस्ताप ठरू शकतात, याचा प्रत्यय एका वाहनधारकाला आला. कोणताही नियमभंग न करता त्याच्या नावावर ई-चलन जारी करण्यात आले. अखेर संबंधित अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर ही चूक दुरुस्त करण्यात आली.

संबंधित वाहनधारकाने आपल्या अनुभवाची माहिती समाजमाध्यमावर शेअर केली आहे. मार्च महिन्याच्या मध्यात त्यांच्या मोबाईलवर वाहतूक नियमभंगाबाबत ई-चलन जारी झाल्याचा संदेश आला. त्यामध्ये दंडाची रक्कम भरण्याचे नमूद होते. मात्र, संपूर्ण मार्च महिन्यात ते गोव्याबाहेर होते आणि संबंधित वाहनाचाही वापर झाला नव्हता. त्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

नेमके काय घडले?

१ मार्चमध्ये वाहनधारकाच्या मोबाईलवर वाहतूक नियमभंगाचे ई-चलन जारी झाल्याचा संदेश आला. मात्र, त्या काळात ते गोव्याबाहेर होते आणि संबंधित वाहनाचाही वापर झाला नव्हता.

२ ई-चलन तपासल्यानंतर मोटारकारच्या नावावर चलन असले, तरी छायाचित्रात भाडेतत्त्वावरील दुचाकी असल्याचे दिसून आले. वाहन क्रमांकातील साधर्म्यामुळे चुकीची नोंद झाल्याचे स्पष्ट झाले.

३ वाहनधारकाने प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली. चौकशीनंतर संबंधित कर्मचाऱ्याने ई-चलन चुकीने जारी झाल्याची कबुली दिली.

४ मात्र, एकदा ई-चलन जारी झाल्यानंतर ते थेट रद्द करता येत नसल्याचे सांगण्यात आले. काही वेळाने ‘एम परिवहन’ संकेतस्थळावर त्याची स्थिती ‘निकाली काढले’ अशी दिसू लागली.

५ नंतर संबंधित ई-चलन क्रमांकच अवैध ठरला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर चुकीची नोंद हटविण्यात आली असून, ई-चलन प्रणालीत अधिक अचूक पडताळणीची गरज अधोरेखित झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT