'हर, हर महादेव', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, आदी घोषणा देत रविवारी (ता.10) डिचोलीत मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौड काढण्यात आली.  Dainik Gomantak
गोवा

डिचोली शहरात घुमला शिवरायांचा जयघोष 'दुर्गामाता दौड' उत्साहात

'हर, हर महादेव', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, आदी घोषणा देत रविवारी (ता.10) डिचोलीत मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौड काढण्यात आली.

दैनिक गोमन्तक

डिचोली: 'हर, हर महादेव', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, आदी घोषणा देत रविवारी (ता.10) डिचोलीत मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौड काढण्यात आली. विशाल आणि समृद्ध हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे. या उद्धेशाने नवरात्रोत्सवानिमित्त हिंदू राष्ट्र संघटना, डिचोलीतर्फे या दौडचे आयोजन केले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलवरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन आणि आरती केल्यानंतर 'दुर्गामाता दौड'ला सुरवात झाली.

सोनारपेठमार्गे आतिल पेठहून दौड जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येताच दौडचा समारोप झाला.

सोनारपेठमार्गे आतिल पेठहून दौड जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येताच दौडचा समारोप झाला. त्याठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून छत्रपतींना अभिवादन करण्यात आले. नरेश परब, मंदार गावडे, शेखर नाईक, तुषार मांद्रेकर, साहिल धोंड, संजू नाईक, निलेश परब, राघलो गोवेकर, विजय होबळे, मंगलदास गोवेकर, मुकुंद कवठणकर, गोविंद साखळकर, संदेश सराफ, आनंद गाड, नरेश पेडणेकर, रामचंद्र पळ, रिचा धोंड, मीना गावडे, शैलेश जाधव, प्रकाश कारंडे, नंदेश च्यारी, चंद्रेश च्यारी, सिया सराफ, सावी सराफ, रमेश टेमकर, अशोक वाडकर, प्रदीप मोर्ये, कनिष्का गावडे, चेतन झुटेकर, अरुण धानोशी आदी शिवप्रेमी या दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT