crack on the railway track Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Waterfall: दुधसागर धबधब्यानजीक रेल्वे रुळावर दरड कोसळली, रेल्वे वाहतूक ठप्प

बोगद्याजवळ दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली

गोमन्तक डिजिटल टीम

Dudhsagar Waterfall दूधसागर धबधब्यावर जाणाऱ्या पहिल्याच बोगद्याजवळ आज (रविवारी) संध्याकाळी दरड कोसळल्याने या मार्गावरील रेल वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. मडगावहून सुटणारी निझामुद्दीन एक्सप्रेस कोसळलेल्या या दरडीमुळे रोखण्यात आली असून दरड हटवण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.

दरम्यान, दूधसागर धबधब्यावर जाण्यास गोवा सरकारने बंदी घातल्याने त्याची काहीच माहिती नसलेल्या परराज्यातील पर्यटकांना फटका बसत आहे, मात्र दूधसागरवर जाण्यासाठी या पर्यटकांकडून विनातिकीट रेल्वेतून प्रवास केला जातो, त्यासाठी ‘चिरिमिरी‘ देण्यात येते, हे उघड झाले आहे.

दूधसागरचे मनमोहक रूप डोळ्यात साठवण्यासाठी हजारोंच्या संख्येने परराज्यातील पर्यटक कुळे रेल्वे स्थानकावर येतात. पण दूधसागरवर जाण्यास बंदी असल्याने हे पर्यटक पाचशे रुपयांची चिरिमिरी देऊन रेल्वेत प्रवेश मिळवतात, आणि रेल्वेत गर्दी करतात.

या आगंतूक पर्यटकांमुळे रेल्वेतील प्रवाशांना फारच त्रास होतो, पण या पर्यटकांना त्याचे काहीच पडलेले नसते. अशा पर्यटकांवर खरे म्हणजे रेल्वे पोलिसांनी कडक कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे, अशी प्रतिक्रिया काही रेल्वे प्रवाशांनी दिली.

कुळेतून दूधसागरवर नेण्यासाठी ‘ओरिसा‘ हे टोपणनाव असलेली एक व्यक्ती पर्यटकांकडून पैसे उकळते आणि ही चिरिमिरी मग रेल्वेचालकांपर्यंत पोचते, अशी माहिती मिळाली आहे.

रेल्वे पोलिस या प्रकारापासून अनभिज्ञ असावेत त्यामुळे असे प्रकार घडत असल्याने हा चिरिमिरीचा प्रकार आधी बंद केला पाहिजे, असे कुळेवासीयांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT