Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: मडगावात 4 लाखांचा गांजा जप्त; क्राईम ब्रँचची शनिवारी मध्यरात्री कारवाई

Goa Drugs Case: गोव्यात गुन्हेगारी वाढतेय: परप्रांतीय गजाआड

Ganeshprasad Gogate

Goa Drugs Case: वाढत्या अपघातांसोबतच वाढत्या गुन्हेगारीमुळे गोव्याचे नाव खराब होत असून पोलिसांसमोर अशा घटना थोपवणे हे एक आव्हान बनले आहे.

गोवा हे पर्यटनदृष्टया नावाजलेले राज्य असून देशी-परदेशी पर्यटकांचा ओढा गोव्याकडे असतो. पर्यटन, नोकरी निमित्ताने काही परप्रांतीय गोव्यात राहत असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांकडून गोव्यात येऊन अवैध धंदे तसेच बेयदेशीर कृत्ये केली जातात.

अशाच प्रकारची घटना शनिवारी मध्यरात्री मडगाव येथे घडली असून एका परप्रांतीयांकडून पोलिसांनी 4 लाखांचा अमली पदार्थ- गांजा जप्त केलाय.

या प्रकरणी मडगाव येथे क्राईम ब्रँचने मध्यरात्री कारवाई करत जीतेंद्र नायक (वय 28 वर्षे, ओडिसा) याला केली अटक केलीय. त्याने हा पदार्थ कुठून आणला तसेच त्याला तो कुठे विकायचा होता का यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही.

1 मार्चला मडगाव पोलिसांनीही अशीच करावी करत एकाला ताब्यात घेतले होते. १ मार्च रोजी रात्री मडगाव रेल्‍वे स्‍थानकाजवळ आके भागात केलेल्‍या कारवाईत आनंद हरिश्र्‍चंद्र साळगावकर (41) याला अटक करुन त्‍याच्‍याकडून 2.71 लाखांचे अंमली पदार्थ पकडले होते.

सदर संशयित ड्रग्‍सची डिलिव्‍हरी करण्यासाठी मडगावात आला असावा असा पोलिसांचा संशय आहे. सध्‍या या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समीर गावकर हे तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT