Goa Drug Network Colvale Central Jail Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Network Colvale Central Jail: कोलवाळ कारागृह बनले ड्रग्ज रॅकेटचे कंट्रोल रूम; आंतरराज्य जाळे, 43 लाखांचा ड्रग्ज साठा जप्त, 5 जण अटकेत

Goa Crime Branch Drug Raid: गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने अत्यंत गुप्तपणे राबवलेल्या विशेष मोहिमेत ड्रग्ज रॅकेटसह दुसऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या गंभीर प्रकरणात, थेट कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाच्या आतूनच अमली पदार्थांचे (ड्रग्ज) आंतरराज्य नेटवर्क चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने अत्यंत गुप्तपणे राबवलेल्या विशेष मोहिमेत ड्रग्ज रॅकेटसह दुसऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला आहे. दिल्ली क्राईम ब्रँच आणि तेलंगणा पोलिसांच्या सहकार्याने दिल्‍लीत टाकलेल्‍या छाप्‍यात सुमारे ४३ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, फरार आरोपींसह पाच जणांना गजाआड करण्यात आले आहे.

१८ जून रोजी क्राईम ब्रँचच्या पथकाने हडफडे येथून अभिराम पुलिक्कल (२६, केरळ) याला स्कूटरवरून जाताना ताब्यात घेतले. २.६५ लाख रुपये किमतीचे मेथाम्फेटामाईन (११.५५७ ग्रॅम) आणि एमडीएमए (९.०७६ ग्रॅम) जप्त करण्यात आले. अभिरामची कसून चौकशी करताना त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता गंभीर बाब समोर आली.

अभिराम यापूर्वी २०२० मधील ‘एनडीपीएस’ गुन्ह्यात कोलवाळ कारागृहात असताना, तेथे अमली पदार्थ प्रकरणातच शिक्षा भोगत असलेला अझरुद्दीन आची उर्फ असरू याच्या संपर्कात आला होता. अझरुद्दीन हा कारागृहाच्या आतूनच ड्रग्ज वितरणाचे संपूर्ण जाळे चालवत असल्याचे निष्पन्न झाले.

क्राईम ब्रँचने तत्काळ न्यायालयाकडून अझरुद्दीनचा ताबा मिळवून त्याला अटक केली. पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली, पोलिस अधीक्षक जिवबा दळवी, पोलिस निरीक्षक अर्जुन सांगोडकर, तुषार लोटलीकर, निखिल पालेकर, मंगेश वेळीपकर, उपनिरीक्षक माधव नाईक व जयराम यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

कारागृहातून चालणाऱ्या या रॅकेटचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. केरळचे मूळ रहिवासी असलेले मुसान मुखिरी आणि मोहम्मद फैझान हे दिल्लीतून या नेटवर्कची साखळी सांभाळत होते. ११ जुलै रोजी गोवा क्राईम ब्रँचच्या माहितीवरून दिल्ली पोलिसांनी छापा टाकून या दोघांना अटक केली. आणि त्यांच्याकडून ४० लाख रुपये किमतीचे १५१ ग्रॅम मेथाम्फेटामाईन व ५१२ ग्रॅम ‘मॅजिक मशरुम’ जप्त केले.

२८ जुलै रोजी ८०,००० रुपयांच्या गांजासह अटक केलेल्या कालिचरण भोल (वेरे) याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. पर्वरी पोलिस ठाण्यातील दरोडा आणि एका खून प्रकरणात गेल्या १८ महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी कृष्णा बेळगावकर हा हैदराबादमध्ये बसून गोव्यात गांजा तस्करीचे नेटवर्क चालवत होता. २९ जुलै रोजी पर्वरी पोलिसांच्या पथकाने हैदराबाद गाठून त्याला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT