Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: वाळपई पोलिसांची मोठी कारवाई! ड्रग्ज तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश, यूपी-बिहारमधील तिघे अटकेत

Valpoi Drug Case: गोवा राज्यात अमली पदार्थांविरोधातील मोहीम तीव्र झाली असतानाच, वाळपई पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत तिघांना रंगेहात पकडले आहे.

Sameer Amunekar

वाळपई: गोवा राज्यात अमली पदार्थांविरोधातील मोहीम तीव्र झाली असतानाच, वाळपई पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत तिघांना रंगेहात पकडले आहे. वाळपई येथील केटीसी (KTC) बसस्थानक परिसरात अमली पदार्थांची विक्री आणि देवाणघेवाण होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी या संशयितांना ताब्यात घेतले.

परप्रांतीय तस्करांचे धागेदोरे

अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी दोन जण उत्तर प्रदेशातील असून, एक जण बिहारचा रहिवासी आहे. हे तिघेही गेल्या काही दिवसांपासून या परिसरात संशयास्पदरीत्या वावरत होते. स्थानिक तरुणांना अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढण्यासाठी ते येथे आले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बसस्थानकासारख्या सार्वजनिक आणि गजबजलेल्या ठिकाणी अमली पदार्थांची डिलिव्हरी देण्याचे त्यांचे धाडस पाहून पोलीसही थक्क झाले आहेत.

मुद्देमाल जप्त

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपींकडून एकूण ३३८ ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत सुमारे ३३,८०० रुपये आहे. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ तस्कर ते कोणाकडून आणायचे, याचा सखोल तपास आता वाळपई पोलीस करत आहेत.

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

बसस्थानकासारख्या ठिकाणी अशा प्रकारे अंमली पदार्थांची विक्री होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच केलेल्या या कारवाईमुळे एका मोठ्या रॅकेटचा छडा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींची अधिक चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

Dwidwadashy Yog 2026: शुक्र-मंगळचा अद्भुत 'राजयोग'! 'या' 3 राशींच्या नशिबात स्वतःच्या घराचं सुख; गुंतवणुकीतूनही मिळणार बक्कळ नफा

काव्या मारनचा 'तो' निर्णय अंगलट! पाकिस्तानी खेळाडूची खरेदी अन् सनरायझर्स टीमचं ट्विटर खातचं सस्पेंड; भारतीय चाहत्यांकडून संताप

SCROLL FOR NEXT