Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: ड्रग्ज तस्करीचा प्रयत्न फसला! म्हापशात 1 लाख 92 हजारांचा गांजा जप्त, आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी

Drug Case: राज्याच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने म्हापसा येथे शनिवारी पहाटे टाकलेल्या छाप्यात संशयित साईश खवारे (२९, व्हेर्ला काणका) याला अटक केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्याच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने म्हापसा येथे शनिवारी पहाटे टाकलेल्या छाप्यात संशयित साईश खवारे (२९, व्हेर्ला काणका) याला अटक करून त्याच्याकडून ३ किलो ८५४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या या अमलीपदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे १ लाख ९२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, अमलीपदार्थविरोधी पथकाने २८ रोजी पहाटे २.३० ते ५.०० च्या दरम्यान म्हापसा परिसरात ही कारवाई केली. संशयिताने आपल्या स्कूटरमध्ये हा गांजा लपवून ठेवला होता. संशयिताला म्हापसा येथील प्रथमश्रेणी न्यायाधीशांसमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला चौकशीसाठी ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम राबविली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ENG vs IND 1st ODI: कॅच तर घेतला, पण श्वास रोखला! लाईव्ह मॅचमध्ये शुभमन-गुरनूर जोरदार धडकले; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हॅरी ब्रूकची शिकार अन् थेट इतिहास! इंग्लंडच्या भूमीवर जसप्रीत बुमराह बनला भारताचा नंबर-1 गोलंदाज; सर जडेजाचा मोडला रेकॉर्ड

Monsoon 2026: मान्सूनचा ब्रेक आता संपणार! उकाड्यापासून मिळणार मुक्ती; बंगालच्या उपसागरातील 'तो' पॅटर्न ठरणार वरदान

'अमेरिका सारखा समुद्री डाकू...!' डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या फतव्यावर ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचा हल्लाबोल; कच्च्या तेलाच्या किमती भडकणार

Budh Uday 2026: 25 जुलैला आकाशात होणार महाचमत्कार! 'या' 5 राशींचे भाग्य एका रात्रीत घेणार गगनभरारी; ऑनलाईन बिझनेस करणाऱ्यांना लॉटरी

SCROLL FOR NEXT