Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: पार्टीत ड्रग विक्री करायाचा होता प्लॅन, गोवा पोलिसांनी सिंधुदुर्गातल्या खानला रंगेहात केली अटक; 25 लाखांचे ड्रग्ज जप्त

Drug Smuggling in Goa: गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी सेलनं (ANC) अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी सेलनं (ANC) ड्रग्ज तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत महाराष्ट्रातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २५.१० लाख रुपये किमतीचा ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील रहिवासी परवेज अली खान (३०) याला गोवा सीमेच्या जवळील पत्रादेवी चौकीवर अटक करण्यात आली.

पोलिसांनी त्याच्याकडून २०८ ग्रॅम एक्स्टेसी पावडर आणि ४३ उच्च-शक्तीच्या एक्स्टेसी गोळ्या जप्त केल्या आहेत. या ड्रग्जचा वापर मुख्यतः गोव्यातील पार्टीमध्ये केला जाणार होता.

परवेज हा मुंबईहून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ गोव्यात आणून स्थानिक वितरकांच्या माध्यमातून ते पर्यटन स्थळांवर पसरवत होता. पर्यटन हंगामात आणि मोठ्या सुट्ट्यांच्या काळात गोव्यात अमली पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.

या काळात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी होत असल्याने पोलिस सतर्क असतात. दरम्यान गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकानं (ANC) कारवाई करत परवेज खानला रंगेहात पकडले आहे.

एसपी टिकम सिंग वर्मा आणि डीवायएसपी नेरलॉन अल्बुकर्क यांच्या नेतृत्वाखाली गोवा पोलिसांच्या ANC विभागानं ही कारवाई केली. आरोपीला पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT