One drowned while celebrating Sao Joao in goa Dainik Gomantak
गोवा

Goa Drowning Accidents : राज्यात दर तीन दिवसांमागे एकाचा बुडून मृत्यू

सहा महिन्यांत 70 जणांना जलसमाधी

दैनिक गोमन्तक

Goa Drowning Accidents : धबधबा किंवा पाण्याने तुडुंब भरलेल्या चिरेखाणीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या अनेकांना मृत्यूने कवटाळले आहे. यावर उपाययोजना म्हणून सरकारने लोकांना धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे.

राज्यात यावर्षी आतापर्यंत 70 जणांचा विविध दुर्घटनांमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. त्यामध्ये उत्तरेत 43, तर दक्षिणेत 27 प्रकरणांचा समावेश आहे. यामुळे दर तीन दिवसांनी एकाचा बुडून मृत्यू होत असल्याने विदारक सत्य समोर आले आहे.

दरवर्षी राज्यात स्थानिक रहिवासी तसेच पर्यटकांचे बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण सरासरी १२० आहे. उत्तरेत समुद्र किनारे जास्त असल्याने बुडून मृत्यू होण्याचे प्रमाणही दक्षिणेपेक्षा अधिक आहे. २०२० साली ११६ जणांना जीव गमवावा लागला होता. २०२१ साली हे प्रमाण वाढून ही संख्या १३१ वर पोहचली होती. २०२२ साली ही संख्या १२९ होती.

यावर्षी ११ जुलैपर्यंत ७० जण बुडून मरण पावले असून त्यामध्ये उत्तरेत ४३ जण, तर दक्षिणेत २७ जणांचा समावेश आहे. यावर्षी जुलै महिन्यात अवघ्या ११ दिवसांतच ८ जणांचा बुडून मृत्यू झाल्याने सरकार खडबडून जागे झाले आहे. धबधब्‍यांच्या ठिकाणी पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जातात. मात्र, तेथे त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीच सुविधा सरकारने केलेली नाही.

निष्काळजीपणा भोवला

गेल्या साडेतीन वर्षांत कळंगुट पोलिस स्थानकाच्या हद्दीत 30 जणांचा बुडून मत्यू झाला. त्यात पर्यटकांची संख्या मोठी आहे. डिचोली पोलिस स्थानकाच्या हद्दीत याच काळात 36 जणांचा मृत्यू झाला.

या भागातील धबधबे, तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्या येथे मौजमजा करण्यासाठी गेलेल्यांना निष्काळजीपणामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. पेडणे तालुक्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या साडेतीन वर्षांत येथे ४५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

जीवघेणे खंदक

राज्यात खाणीमधून चिऱ्यांचे उत्खनन केल्यानंतर त्या बुजवण्याची गरज आहे. मात्र, तसे न करता त्या तशाच ठेवल्याने पावसाळ्यात या खंदकात पाणी भरते. गावातील मुले या खंदकात पोहण्यासाठी उतरतात अन् पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने जीव गमावून बसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025 Schedule: प्रतीक्षा संपली! 'आशिया कप'चं वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT