Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: गोव्यात पावसाच्या तुटवड्याचा भातशेतीला फटका; 25 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, शेतकऱ्यांना अर्जाचे आवाहन

Goa Paddy Crop Loss: राज्यात यंदा सुमारे ३० टक्के पावसाचा तुटवडा जाणवल्याने त्याचा फटका भातशेतीला बसला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात यंदा सुमारे ३० टक्के पावसाचा तुटवडा जाणवल्याने त्याचा फटका भातशेतीला बसला आहे. विशेषतः मरड क्षेत्रात तसेच सिंचनाची सुविधा उपलब्ध नसलेल्या भागातील सुमारे २५ हेक्टर भातशेतीचे पाण्याअभावी नुकसान झाल्याचे कृषी खात्याच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी ही माहिती दिली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून योग्य ती मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भातशेतीची कापणी करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रीय कृषी कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन देसाई यांनी केले.

अर्ज प्राप्त झाल्यानंतर कृषी अधिकारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करून त्याचा अहवाल सादर करतील. राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले नसले तरी पाण्याअभावी भात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. अनेक भागांत कापणी सुरू झाली आहे.

२३८७९ हेक्टरमध्ये भातशेती!

गेल्या वर्षी खरीप हंगामात राज्यात २३ हजार ८७९ हेक्टर क्षेत्रात भात लागवड झाली होती. त्यातून ८० हजार ५८६ टन उत्पादन मिळाले होते. यंदा पावसाच्या तुटवड्यामुळे भात उत्पादनात किमान २० ते ३० टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: अभिषेक शर्माला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! SKYचा मोडणार मोठा रेकॉर्ड; दुसऱ्या टी-20 सामन्यात गोल्डन चान्स

VIDEO: मडगाव रेल्वेस्थानक परिसरात एफडीएची धडक कारवाई; 408 किलो मांस जप्त

FDA Raid: गोव्यात विनापरवाना कॅटरर्स, पार्टी हॉलवर एफडीएचा बडगा; तीन आठवड्यांत परवाना घ्या, अन्यथा 10 लाखांपर्यंत दंड!

Lucknow Double Murder: संसारात काळाची सावली! लखनौमध्ये आई आणि मुलीची गळा दाबून निर्घृण हत्या; नेमकं काय घडलं 'त्या' रात्री?

VIDEO: काँग्रेसच्या आंदोलनात जोरदार राडा! महिला नेत्यांमध्ये आधी बाचाबाची, नंतर एकमेकींना मारल्या कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT