Driving Licence  Dainik Gomantak
गोवा

Goa Driving Licence: गोव्यात 18 ऐवजी 16व्या वर्षीच लायसन्स दिले असते, काँग्रेस नेत्याचे विधान; परदेशात वयोमर्यादा काय?

Vijay Bhike statement: "मी मुख्यमंत्री असतो तर 16व्या वर्षी मुलांना लायसन दिलं असतं"

गोमन्तक डिजिटल टीम

Can a 16 year old drive in India Explained in Marathi Goa Latest News

सध्या गोव्याच्या विविध ठिकाणांहून अपघाताच्या बातम्या समोर येतायत. काहींच्या मते परराज्यातून येणारे मद्यधूंद पर्यटक तर काहींच्या मते रस्त्यांची दुरावस्था अपघातांसाठी कारणीभूत ठरत आहेत. यावरून राज्य सरकारला धारेवर धरलं जातंय.

शनिवारी काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी "मी मुख्यमंत्री असतो तर 16व्या वर्षी मुलांना लायसन दिलं असतं" असं रोखठोक वक्तव्य केलं. हे विधान करताना त्यांनी परदेशाचे दाखलेही दिलेत. पण खरंच परदेशात काय नियम आहेत, भारतात काय नियम आहे हे जाणून घेऊया...

काँग्रेस नेत्याने काय म्हटले होते?

भारतात 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते, जी उत्तीर्ण होताच नागरिकाला गाडी चालवण्याचा हक्क मिळतो, मात्र विजय भिके यांच्या मतांमध्ये काहीशी तफावत जाणवते. गाडी ही आजच्या जगाची गरज आहे त्यामुळे काही ठराविक जागांमध्ये, काहीशी स्पीड लिमिट ठेऊन गाडी चालवायची परवानगी दिल्याने पालकांचा वेळ वाचेल असं त्यांचं म्हणणं आहे.

युरोपीय देशांमध्ये जर का 16व्या वर्षी लायसन देत असतील तर आपण का मागे आहोत असं प्रश्नचिह्न त्यांनी उपस्थित केलंय.

भारतात नियम काय?

भारतात आणि गोव्यातही 18 वर्षांखालील व्यक्तीला चार चाकी गाडी चालवता येत नाही. नवीन नियमानुसार अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी चार चाकी गाडी चालवताना आढळल्यास संबंधित अल्पवयीन मुलाच्या पालकांवर कारवाई करता येते.

परदेशात नियम काय?

1) अमेरिकेत सरकारकडून प्रत्येक राज्याला ड्रायव्हिंग वय निश्चित करण्याची मुभा आहे, साधारणतः हे वय 16-18 एवढंच असतं.

2) योग्य आणि वैध विमा असलेला 16 वर्षांवरील कुठलाही रहिवासी कॅनडामध्ये ड्रायव्हिंग करू शकतो, मात्र त्यांच्याजवळ प्रादेशिकरित्या जारी केलेला परवाना असणं भाग आहे.

3) ग्रेट ब्रिटनमध्ये 15 वर्ष आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर गाडी चालवण्यासाठी तात्पुरत्या लायसन्ससाठी अर्ज करता येतो आणि १७ व्या वर्षांपासून गाडी चालवण्याचा परवाना मिळतो. मात्र जर का एखाद्या नागरिकाजवळ PIP ची सोया उपलब्ध असेल तर 16व्या वर्षी गाडी चालवता येते.

4) जर्मनीमध्ये मात्र ड्रायविंग लायसन्स मिळवण्यासाठी किमान वय 18 वर्ष असावंच लागतं.

5) फ्रान्समध्ये गाडी चालवायची असेल तर 15 व्या वर्षी कार, 16 व्या वर्षी मोटारसायकल आणि 21व्या वर्षी कार्गो वाहनांसाठी लायसन दिलं जातं.

6) पोर्तुगालमध्ये 18व्या वर्षी गाडी चालवण्याचा परवाना मिळवला जाऊ शकतो.

7) दक्षिण आफ्रिकामध्ये 18 किंवा त्याहून अधिक वर्षांवर लायसन मिळवण्याची परवानगी मिळते.

8) यूएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये विशेष गरज असल्यास 17 व्या वर्षी लायसन मिळवता येतं, मात्र कारसाठी 18 तर अवजड वाहनांसाठी 20 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे

9) इटलीमध्ये काही मर्यादेसह 18व्या वर्षी लायसन मिळते.

10)टर्कीमध्ये देखील 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे.

वरील युरोपियन देशांमधील ड्रायविंग लायसनचा कायदा पहिला तर भारत आणि इतर देशांमध्ये वयाचा अधिक फरक दिसत नाही.

गाडी चालवण्याचा कायदा हा केवळ लायसनपर्यंत मर्यादित नसून त्यात बाकी ट्राफिक नियमांचा देखील समावेश होतो, त्यामुळे इतर देशांमधल्या ड्रायविंग लायसनचं वय आणि भारतातील कायदा तपासताना हे सर्व घटक महत्वाचे ठरतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa-Bhopal Flight: 1 डिसेंबरपासून गोवा-भोपाळदरम्‍यान थेट विमानसेवा, पर्यटनाला मिळणार चालना!

Goa Live Updates: भगवान बिरसा मुंडा गौरव यात्रेला आजपासून सुरुवात

"IFFI मुळे भारतीय चित्रपटांचे बहुआयामी रूप समोर आले पाहिजे" डॉ. एल. मुरुगन यांच्याकडून तयारीचा आढावा

गोव्याच्या मुख्य सचिवांना SC ने फटकारले, नियमांतील बदलांसाठी मुख्य न्यायाधीशांच्या नावाचा वापर; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Rain: राज्यात पावसानं पुन्हा उडवली दाणादाण, पर्वरीत वाहनधारकांची त्रेधातिरपिट; चिखलामुळे वाहतूक कोंडी!

SCROLL FOR NEXT