SIR Voter Count Increase Dainik Gomantak
गोवा

SIR Voter Count Increase: गोव्यात मतदारयादीतून 1 लाख नावे वगळली जाणार, ही चर्चा ठरली फोल! उलट 31,815 मतदारांची वाढ

Election Commission: ‘एसआयआर’नंतर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीत सुमारे ४३ हजार नव्या मतदारांची भर पडली असून, ११ हजार ते ११ हजार ५०० मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर (एसआयआर) सुमारे एक लाख मतदारांची नावे वगळली जाण्याची चर्चा सुरू असतानाच, प्रत्यक्षात मतदारसंख्येत ३१ हजार ८१५ मतदारांची वाढ झाल्याची माहिती मुख्य मतदार अधिकारी डॉ. संजय गोयल यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

‘एसआयआर’नंतर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीत सुमारे ४३ हजार नव्या मतदारांची भर पडली असून, ११ हजार ते ११ हजार ५०० मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ‘एसआयआर’मुळे राज्यातील मतदारसंख्येत मोठी घट होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. विशेषतः सुमारे एक लाख मतदारांची नावे यादीतून कमी होण्याची चर्चा होती.

मात्र, प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर ही शक्यता फोल ठरली आहे. वगळलेल्या नावांपेक्षा नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांची संख्या अधिक असल्याने एकूण मतदारसंख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे. गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीनुसार, सुमारे ४३ हजार नव्या मतदारांची नोंद झाली आहे, तर विविध कारणांमुळे ११ हजार ते ११ हजार ५०० मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारसंख्येत ३१ हजार ८१५ मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे.

प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपल्या नावाची पडताळणी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलांत त्रुटी असल्यास तसेच नाव समाविष्ट करणे अथवा वगळण्याबाबत हरकती असल्यास ११ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींची छाननी करून आवश्यक दुरुस्त्या केल्यानंतर ४ जानेवारी २०२७ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी प्रारूप यादीत आपले नाव आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘त्‍यांची’ नावे कायम

प्रारूप मतदारयादीत परेश साळगावकर यांनी आपल्या कुटुंबीयांच्या नावांची ऑनलाईन पडताळणी केली. त्यावेळी सर्वांची नावे जुन्या मतदार ओळखपत्र क्रमांकांसह यादीत कायम असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'चेंडूशी छेडछाड करण्यासाठी....', सँडपेपर प्रकरणावरून ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये आरोप-प्रत्यारोप! उस्मान ख्वाजांच्या आरोपांवर पॅट कमिन्सचं प्रत्युत्तर

FDA Raid: ख्रिसमसच्या बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवले होते जूनपासूनचे चिकन! वेर्णातील शीतगृहात 1700 किलो साठा जप्त; एफडीएकडून नष्ट

Jensen Huang Net Worth Drop: राजीनामा देताच जेन्सन हुआंग यांना मोठा झटका! एका झटक्यात बुडाले तब्बल 60,000 कोटी रुपये; जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

Microsoft Outlook Servers Down: मायक्रोसॉफ्ट आउटलुकचे सर्व्हर अचानक ठप्प! लाखो युजर्सना ईमेल पाठवणे आणि लॉग-इन करण्यात अडचण

UAE Highway Truck Accident: युएईमध्ये मध्यरात्री काळाचा घाला! अनियंत्रित ट्रकने 23 वाहनांना उडवले; भारतीय नागरिकांसह 14 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT